Pune Crime : लग्नाचे अमिष दाखवून तरूणीवर बलात्कार; लोणी काळभोरमध्ये एकावर गुन्हा दाखल

लग्नाचे अमिष‌ दाखवून २०२२ पासून एका तरूणीवर वारंवार बलात्कार केला. तसेच ती गरोदर राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडून वेगळी जात असल्याने लग्न करू शकत नाही
crime
crimeesakal
Updated on

उरुळी कांचन : लग्नाचे अमिष‌ दाखवून २०२२ पासून एका तरूणीवर वारंवार बलात्कार केला. तसेच ती गरोदर राहिल्यानंतर बळजबरीने गर्भपात करण्यास भाग पाडून वेगळी जात असल्याने लग्न करू शकत नाही, असे म्हणून तरूणीची फसवणूक केल्याप्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

संयोग संजय गायकवाड, (वय २४, रा. माळीमळा, पार्टी सेलीब्रिया हॉल समोर, लोणी काळभोर ता. हवेली) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणी एका १९ वर्षीय तरूणीने फिर्याद दिली आहे.

संयोग गायकवाड याने पीडित तरूणीला प्रेमात पाडून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर त्याने २०२२ मध्ये सर्वप्रथम धनकवडी, पुणे येथील शंकर महाराज मठाजवळ असलेल्या आरोपी त्याच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या असणाऱ्या दुकानामध्ये शरीर संबंध ठेवले. त्यानंतर त्याने पीडितेसोबत धुमाळमळा, लोणी काळभोर येथील एका लॉजवर वारंवार शरीरसंबंध ठेवले.

पीडित तरूणी गर्भवती राहिली. त्यानंतर गायकवाड याने पीडितेच्या गर्भातील १० आठवडे १५ दिवस वयाच्या बाळाचा उरूळी कांचन येथील एका हॉस्पिटलमध्ये गर्भपात करून घेतला. त्यानंतर पीडित तरूणी मागासवर्गीय असल्याचे कारण पुढे करत तिच्याशी लग्न करण्यास‌ नकार देत पीडितेची फसवणूक केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पीडितेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात गायकवाड याच्या विरोधात फिर्याद दिली. अधिक तपास लोणी काळभोर पोलीस करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.