Crime News : जादूटोण्याने मुलाला बरे करण्याच्या आमिष; महिलेकडून ३५ लाख रुपये उकळले

अघोरी विद्या, जादूटोणा करून मुलाला आजारातून बरे करण्याचे आमिष दाखवून आरोपींनी एका महिलेकडून ३५ लाख रुपये उकळले.
Black Magic
Black Magic esakal
Updated on

पुणे - अघोरी विद्या, जादूटोणा करून मुलाला आजारातून बरे करण्याचे आमिष दाखवून आरोपींनी एका महिलेकडून ३५ लाख रुपये उकळले. त्यानंतर आणखी ५० लाख रुपये न दिल्यास जादूटोण्याची भीती दाखवल्याने महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. हा प्रकार चंदननगर परिसरात २०१६ ते तीन ऑक्टोबर २०२३ या कालावधीत घडला.

या प्रकरणी एका महिलेने (वय ४०, रा. चव्हाणनगर, चंदननगर) फिर्याद दिली आहे. त्यावरून चंदननगर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध नरबळी आणि इतर अमानुष अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चारुदत्त संजय मारणे (वय ३१, रा. लिपाणे वस्ती, आंबेगाव), पूनम घनश्याम कोहंडे (वय ३८), नीलम राहुल जाधव (वय ३५, रा. कर्वेनगर), देविका अमित जुन्नरकर (वय ३०, रा. कोथरूड), संतोष मारुती येनपुरे (वय ४५, रा. गणेशपुरी सोसायटी, वारजे माळवाडी) अशी गुन्हा दाखल केलेल्या संशयितांची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिलेचा मुलगा आजारी असल्याने आरोपींनी त्याला बरे करण्यासह कौटुंबिक अडचणी सोडविण्याचे आमिष दाखवून विश्वास संपादन केला. अघोरी विद्या, जादूटोणा करून मुलाला आजारातून बरे करू, असे सांगून आरोपींनी महिलेकडून वेळोवेळी ३५ लाख रुपये उकळले. त्यानंतर आरोपींनी महिलेकडे आणखी ५० लाख रुपयांची मागणी केली.

तसेच, एक नरबळी द्यावा लागेल. नरबळी न दिल्यास कुटुंबाचा सर्वनाश होईल. मुलगा आणि पतीचा मृत्यू होईल, अशी भीती आरोपींनी दाखवली. या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने आत्महत्येचा प्रयत्न केला. अखेर महिलेने पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक भगवान कांबळे करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.