Akash Darshan: ध्रुवताऱ्याचं स्थान अढळं का? नक्षत्रांचा अर्थ काय?; अंनिसच्या 'आकाश दर्शन'नं दूर केले अनेक संभ्रम

मानवी जीवनातील कर्मकांड, शोषण, फसवणूक यांचा संबंध ग्रह-ताऱ्यांशी कसा जोडला जातो याची माहिती यावेळी देण्यात आली.
Akash Darshan: ध्रुवताऱ्याचं स्थान अढळं का? नक्षत्रांचा अर्थ काय?; अंनिसच्या 'आकाश दर्शन'नं दूर केले अनेक संभ्रम
Updated on

पुणे : ध्रुवताऱ्याचं स्थान अढलं का? नक्षत्रांचा नेमका अर्थ काय? ग्रेगेरिअन कॅलेंडरमधील महिन्यांची नावं कशी पडली? आठवड्यातील सातही वारांचा भारतीय संस्कृतीशी काय संबंध आहे? खगोलशास्त्रासंबंधीच्या अशा अनेक प्रश्नांची उत्तर लहान-थोरांना मिळाली. तसेच ग्रह-ताऱ्यांसंबंधीचे अनेक रंजक किस्से आणि माहितीनं उपस्थितांच्या ज्ञानात भर टाकली. निमित्त होतं 'आकाश दर्शन' या उपक्रमाचं. (Maha ANIS program Akash Darshan happened at Wagholi Pune)

Akash Darshan: ध्रुवताऱ्याचं स्थान अढळं का? नक्षत्रांचा अर्थ काय?; अंनिसच्या 'आकाश दर्शन'नं दूर केले अनेक संभ्रम
Karnataka: ठरलं! CM पदासाठी 'या' नावावर शिक्कामोर्तब; केंद्रीय निरीक्षकांनी खर्गेंकडं सोपवला अहवाल

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समिती शिवाजीनगर पुणे शाखा, क्रिएटिव्ह कोचिंग क्लासेस आणि हॉटेल कांचन शिवार यांच्या संयुक्त विद्यमानं पुण्यातील वाघोली इथं शुक्रवारी (दि. १२) 'आकाश दर्शन' या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. रात्री ९ ते पहाटे ३ वाजेपर्यंत हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला 161 जणांची उपस्थिती लावली होती. यावेळी विशाल विमल आणि प्रवीण खुंटे यांनी चमत्काराचे प्रयोग आणि त्यामागील विज्ञान उपस्थितांना समजावून सांगितलं. याला बच्चे कंपनीनं देखील चांगला प्रतिसाद दिला.

Akash Darshan: ध्रुवताऱ्याचं स्थान अढळं का? नक्षत्रांचा अर्थ काय?; अंनिसच्या 'आकाश दर्शन'नं दूर केले अनेक संभ्रम
Fact Check: राहुल गांधींना दोषी ठरवणाऱ्या न्यायाधीशांची बढती सुप्रीम कोर्टानं खरंच रोखलीए? जाणून घ्या

कर्मकांड, शोषण, फसवणूकीची केली उकल

दरम्यान, ठाणे येथील खगोलअभ्यास, अंनिसचे कार्यकर्ते प्रा. प्रकाश पारखे यांनी ग्रह, तारे, नक्षत्र, राशी, वार, महिने, भरती, ओहोटी यासंबंधी मांडणी करत याच्याशी संबंधीत मानवी जीवनातील कर्मकांड, शोषण, फसवणूक याची उकल केली. अनेक रंजक किस्से सांगत आणि खगोलीय अविष्कारांची अत्यंत सखोल आणि विस्तृत माहिती त्यांनी दिली. तसेच हेमंत जंगम यांनी दुर्बिणीद्वारे चंद्र आणि आकाशदर्शन घडविले. सलग 6 तास न कंटाळता मोठ्या उत्साहानं हा कार्यक्रम पार पडला.

Akash Darshan: ध्रुवताऱ्याचं स्थान अढळं का? नक्षत्रांचा अर्थ काय?; अंनिसच्या 'आकाश दर्शन'नं दूर केले अनेक संभ्रम
HuT Case: NIAची मोठी कारवाई! कट्टरतावाद्यांचं मोड्युल उद्ध्वस्त; डार्क वेबचा वापर, ओळख लपवून कारवाया

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन माधुरी गायकवाड यांनी केलं तर प्रास्ताविक कीर्ती कोलते यांनी केलं. विशाल विमल यांनी उपक्रमाची भूमिका विशद केली. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील भोसले, माधुरी गायकवाड, कीर्ती कोलते, अमन कांचन, स्नेहा पाटोळे, पूनम पचंगे, प्रवीण खुंटे, तेजस्विनी कुटे, मुकेश रजपूत, विनोद लातूरकर, रविराज थोरात, अश्विनी गायकवाड, आकाश छाया, अरिहंत अनामिका, श्याम येणगे, बाळासाहेब कांचन, सुभाष कोलते, मधुरा कांचन, सम्यक वि म, संदीप कांबळे, अक्षय दावडीकर, प्रशांत मोरे, विशाल विमल आदींचा हातभार लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.