पुणे : कृषी कायद्याविरोधात दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला साथ देत, विविध राजकीय पक्ष-संघटनांनी आयोजिलेला मोर्चा पोलिसांनी मंगळवारी रोखला. मोर्चाला परवानगी नाकारल्याने लोकमान्य टिळक चौकात (अलका टॉकी चौक) गोंधळ उडाला.
शेतकऱ्यांच्या मागण्यांना बळ देण्याचे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस आणि शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी पुणेकरांना केले आहे. तर अन्य राजकीय पक्षाच्या संघटनांनीही बंद पाठिंबा दिला आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कृषी कायद्यातील जाचक तरतुदींवरून आक्रमक पवित्रा घेतल्या शेतकऱ्यांनी मंगळवारी देशव्यापी बंदची हाक दिली आहे. विशेषत: केंद्र सरकारच्या विरोधकांनी आंदोलनाची व्यापकता वाढविण्याच्या उद्देशाने बंदला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्याचाच भाग म्हणून पुण्यातही कडकडीत बंद पाळण्याचा निर्धार महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी केला.
बंदमध्ये सहभाग होऊन केंद्र सरकारचा निषेध करीत महाविकास आघाडीतील घटक पक्ष मोर्चा काढणयाचे नियोजन महाविकास आघाडीने केले होते. तयानुसार सकाळी साडेदहा वाजता मोर्चा काढण्यात येणार होता. लोकमान्य टिळक चौकातून (अलका टॉकीज) येथून मोर्चाला सुरवात होणार असलयाने तयाठिकाणी लोक जमले. ,महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यासमोर समारोप होता. परंतु, कोरोनामुळ मोर्चा काढ़ता येणार नसलयाचे कारण देत पोलिसांनी मोर्चा अडवला.
अकरावीच्या दुसऱ्या फेरीतील प्रवेशासाठी ७ हजार विद्यार्थ्यांची सहमती
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे, कॉंग्रेसचे रमेश बागवे, शिवसेनेचे संजय मोरे यांच्यासमवेत कॉंग्रेस भवनात झालेल्या बैठकीला विविध क्षेत्रातील संघटनांचे प्रतिनिधी उपस्थितीत होते. दरम्यान, शेकाप, हमाल पंचायत, पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील रिक्षा संघटना, मार्केटयार्ड कामगार युनियन, पुना मर्चंट चेंबर, पुणे पेट्रोल-डिझेल असोसिएशन, पुणे व्यापारी संघटना, पीएमपीएल-इंटक व इतर संघटनांचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थितीत होते, असे महाविकास आघाडीच्या निवेदनात स्पष्ट केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.