...तर रासप लोकसभेच्या सर्व जागा स्वबळावर लढणार - महादेव जानकर

"राष्ट्रीय समाज पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका आत्तापर्यंत स्वबळावर लढल्या आहेत.
mahadev jankar rashtriya samaj paksha will fight own lok sabha election politics
mahadev jankar rashtriya samaj paksha will fight own lok sabha election politicssakal
Updated on

Pune News : "राष्ट्रीय समाज पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका आत्तापर्यंत स्वबळावर लढल्या आहेत. आगामी लोकसभा निवडणूकीसाठी भाजप महायुतीसमवेत आपली चर्चा सुरू आहे, परंतु त्यांच्याकडून प्रतिसाद न मिळाल्यास राज्यात लोकसभेच्या सर्व जागा पक्षाकडून लढविल्या जातील'' असा इशारा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी दिला.

राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने पश्‍चिम महाराष्ट्र, पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील पदाधिकाऱ्यांची स्वारगेट जवळील मित्र मंडळ चौक येथे नुकतीच बैठक संपन्न झाली. या बैठकीत जानकर यांनी उपस्थित पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्यादृष्टीने मार्गदर्शन केले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष काशिनाथ शेवते, शहराध्यक्ष बालाजी पवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

जानकर म्हणाले, ""महापालिका, जिल्हा परिषद यांसारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पक्ष स्वबळावर लढलेला आहे. गुजरातमधील वडोदरा येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाचे २८ नगरसेवक आहेत.

त्यामुळे यापुढेही स्थानिक स्वराज्य संस्थांबाबत स्वबळावर लढण्याचा निर्णय कायम राहील. मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी भाजप महायुतीने पक्षाला प्रतिसाद दिला नाही, तर पक्ष स्वबळावर लढेल. विधानसभा निवडणुकीत पक्षाचे १५ आमदार निवडून आल्यास पक्षाची ताकद निश्‍चितच वाढेल.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.