...म्हणून महामेट्रोला जलसंपदा विभागाने पुण्यात ठोठावला दंड ! 

Mahametro fined by Water Resources Department in Pune!
Mahametro fined by Water Resources Department in Pune!
Updated on

पुणे : स्वारगेट चौकातील मेट्रोच्या भुयारी स्थानकासाठी सुरू असलेल्या खोदकामात लागलेले पाणी मुठा उजव्या कालव्यात सोडल्याबद्दल महामेट्रोच्या दोन ठेकेदारांना जलसंपदा विभागाने दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम तातडीने भरण्यासही त्यांना सांगितले आहे. 

स्वारगेटच्या जेधे चौकात एसटी स्थानकाच्या काही भागात मेट्रोच्या भुयारी स्थानकाचे काम सुरू आहे. त्याच्यासमोर मेट्रोच्या ट्रान्स्पोर्ट हबचेही काम सुरू आहे. त्याचे काम करणारे कंत्राटदार टाटा- गुलेरमार्ग आणि जे. कुमार इन्फ्रा यांना प्रत्येकी 1500 रुपयांचा दंड जलसंपदा विभागाने 28 सप्टेंबर रोजी ठोठावला आहे. तसेच खोदकामातील पाणी कालव्यात सोडू नये, असेही बजावले आहे. 

या बाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पर्वती विधानसभा मतदारसंघातील उपविभाग अध्यक्ष संदीप करपे, सागरे बाठे, अक्षय जगदाळे, रोहित वाडकर यांनी जलसंपदा विभागात तक्रार केली होती. त्यात म्हटले होते, महामेट्रोकडून सुरू असलेल्या खोदाईत रसायन मिश्रित पाणी आणि सांडपाणी मुठा उजवा कालव्यात बेकायदेशीरपणे सोडले जात आहे. या कालव्यातील पाणी दौंड, इंदापूर भागातील शेतकरी शेतीसाठी, पिण्यासाठी वापरतात. मात्र, त्यात दूषित पाणी सोडल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोक्‍यात आले आहे. त्यासाठी संबंधित ठेकेदाराविरुद्ध कारवाई करून प्रदूषण रोखावे, असे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मनसेकडून आलेल्या तक्रारीची दखल घेऊन जलसंपदा विभागाने 25 सप्टेंबर रोजी ठेकेदारांना नोटीस दिली होती. त्यात खोदकामातील पाणी कालव्यात सोडण्याची परवानगी घेतली असल्याचे पत्र सादर करण्यास सांगितले होते. परंतु, संबंधित ठेकेदारांनी त्याला दाद दिली नाही. त्यामुळे जलसंपदा विभागातील पुणे पाटबंधारे शाखेतील सहायक अभियंता यांनी दोन्ही ठेकेदारांना प्रत्येकी 1500 रुपयांचा दंड 28 सप्टेंबर रोजी सुनावला. 

या बाबत मनसेचे कर्पे म्हणाले, "खोदकामात रसायसन मिश्रित पाणी आहे. तसेच सांडपाणीही आहेत. हे पाणी पाईपलाईनद्वारे मुठा उजवा कालव्यात सोडण्यात येत आहे. त्यामुळे कालव्यातील पाणी प्रदूषित होत आहे. त्यामुळे ठेकेदारांविरुद्ध फौजदारी कारवाई करण्याची मागणी आम्ही जलसंपदा विभागाकडे केली होती. परंतु, त्यांनी केवळ पंधराशे रुपये दंड सुनावला आहे. त्यामुळे फौजदारी कारवाईसाठी आम्ही आता पाठपुरावा करणार आहोत.'' 

पिंपरी-चिंचवडच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा 

पिंपरी चिंचवड- स्वारगेट आणि वनाज - रामवाडी मार्गावर सध्या महामेट्रोकडून मेट्रोमार्गाचे काम सुरू आहे. जेधे चौकात महामेट्रोचे भूमिगत स्थानक आणि पादचारी मार्ग आहे. तसेच या चौकातच महामेट्रो ट्रान्स्पोर्ट हब उभारणार आहे. त्यात सुमारे 20 मजल्यांची इमारत उभारली जाणार आहे. दरम्यान, या बाबत महामेट्रोचे महाव्यवस्थापक हेमंत सोनवणे म्हणाले, ""शासकीय नियमांनुसारच काम करण्याचा महामेट्रोने सर्वच ठेकेदारांना आदेश दिला आहे. त्यांनी आवश्‍यक असलेली परवानगी घेऊनच काम करणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांना पुन्हा सूचना देण्यात येतील.'' 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.