Pune News : वीज बचतीची सुरवात सिंहगड रस्त्यावरून

पुणे महापालिकेचे वीज बिल करण्यासाठी राज्य शासनाच्या ‘महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) सोबत करार
MAHAPREIT electricity save street light change on sinhagad road vikram kumar pune pmc
MAHAPREIT electricity save street light change on sinhagad road vikram kumar pune pmcsakal
Updated on

पुणे : पुणे महापालिकेचे वीज बिल करण्यासाठी राज्य शासनाच्या ‘महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्रौद्योगिकी मर्यादित (महाप्रित) सोबत करार केलेला आहे. त्यानुसार वीज बचत करण्यासाठी सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पथ दिवे बदलून काम केले जाणार आहे.

तसेच जलशुद्धीकरण केंद्रावरील २० मोठे पंप बदलून त्यांच्या ठिकाणी नवे व वीज खर्च कमी करणारे पंप लावले जाणार आहेत. अशी माहिती महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी दिली.

पुणे महापालिकेच्या वास्तू, मैलापाणी प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, पथदिवे यासह इतर ठिकाणी वर्षभरात २९.१० कोटी वीज युनिट विजेच्या वापरासाठी १५३ कोटी रुपये वीज बिल भरावे लागत आहे.

MAHAPREIT electricity save street light change on sinhagad road vikram kumar pune pmc
Pune University : पुणे विद्यापीठ व्यवस्थापनात विद्यार्थी हितालाच तिलांजली!

दरवर्षी हा खर्च वाढत जात असल्याने वीज बचतीसाठी प्रयत्न सुरू केले केले आहेत. यामध्ये महाप्रिततर्फे जास्त वीज लागणारी उपकरणे बदलून त्या ठिकाणी नवी उपकरणे बसवली जातील. त्यातून वीज बिलात बचत झाल्यास त्यातील ८० टक्के रक्कम ‘महाप्रित’ला तर २० टक्के रक्कम महापालिकेला मिळणार आहे.

शहरात एकूण १ लाख ८० हजार पथदिवे आहेत. त्यातील ९० हजार पथदिव्यांवर टाटा कंपनीचे फिटिंग (दिवे) आहेत. आणखी पाच वर्ष या कंपनीकडे हे दिवे आहेत. तर उर्वरित ९० हजार पथदिव्यांची देखभाल महापालिका करत आहे.

MAHAPREIT electricity save street light change on sinhagad road vikram kumar pune pmc
Pune Rain News : मुळशी तालुक्यात पावसाची संततधार, बंधारे भरण्याच्या मार्गावर

हे पथदिवे महाप्रितच्या ताब्यात दिले जाणार आहेत. त्याची सुरवात सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातून झाली आहे. या क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील १० हजार पथदिवे ‘महाप्रित’कडे दिले गेली आहे.

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयातील आत्ता ३ हजार दिवे बदलले जाणार असून, आतपर्यंत ४०० दिवे बदलले आहेत. पुढील काम १० दिवसात पूर्ण होईल. जलशुद्धीकरण केंद्रावर मोठे पंप बसविण्यात आले आहेत. त्याचा सर्वाधिक खर्च महापालिकेला येतो.

MAHAPREIT electricity save street light change on sinhagad road vikram kumar pune pmc
Pune Crime : व्यापाऱ्यावर गोळीबार करणार्‍या आरोपींकडून दोन पिस्तुलांसह ३१ जिवंत काडतुसे जप्त

त्यामुळे पहिल्या टप्प्यात २० पंप बदलले जाणार आहेत. ज्या ठिकाणचे पंप नवे आहेत किंवा ते अद्ययावत करण्यासाठी जास्त खर्च केला आहे असे पंप बदलले जाणार नाहीत, असे कुमार यांनी सांगितले.

महाप्रित नेमके काय करणार

- वीज बचतीसाठी महापालिकेकडील वीज उपकरणे बदलणार

- एसी, फॅन, ट्युब लाइट, पंप, पथदिवे यासह इतर उपकरणांचा समावेश

- वीज खर्च कमी करणारे नवे उपकरणे लावली जाणार

- त्यासाठी महाप्रितने सर्व विभागांची माहिती संकलित करून डीपीआर तयार केला आहे

- वीज बिलातून मिळणाऱ्या फायद्यातून ८० टक्के महाप्रित घेणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.