पुणे : अनैतिक संबंधातून मठाधिपती असलेल्या महाराजाने साथीदाराच्या मदतीने एकाचा खून करुन त्याचा मृतदेह कात्रज घाटात टाकून अपघाताचा बनाव रचला. भारती विद्यापीठ पोलिसांनी या गुन्ह्याचा अवघ्या बारा तासाच्या आत छडा लावत महाराजासह चौघांना अटक केली. ही घटना वाल्हेकरवाडी येथे घडली.
आनंद गुजर (वय ४४, रा.आकुर्डी), असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. महाराज रमेश कुंभार, मठात काम करणारा यश निकम, अशोक बडगाम आणि आनंद यांच्या पत्नीला (सर्वांची पुर्ण नावे माहित नाहीत)अटक केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक जगन्नाथ कळसकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज नव्या घाटातील हॉटेल मराठी शाहीसमोर एक व्यक्ती मृत असल्याची खबर पोलिसांना शनिवारी मिळाली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल केला. दरम्यान, पोलिसांना मृतदेहाजवळ एक ज्युपिटर दुचाकी आढळली. तिचा नंबर तपासल्यानंतर तो बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांनी चॅसी नंबरवरुन गाडी मालकाचा शोध लावला. ही गाडी आनंद गुजर याची असल्याचे उघड झाले.
पोलिसांनी केलेल्या तपासात गुजर याची पत्नी मागील सहा महिन्यांपासून महाराजांच्या मठात रहात होती. यावरुन गुजर हा शुक्रवारीमठामध्ये गेला. तेथे त्याची पत्नी व महाराजांबरोबर भांडणे झाली. या भांडणात महाराज, पत्नी व महाराजांच्या सेवेकऱ्यांनी त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत आनंदचा मृत्यू झाला. त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा महाराजाने कट रचुन मृतदेह ब्रीझा गाडीमध्ये ठेवला. तर आनंद आलेल्या ज्युपिटर स्कुटरचा नंबर बदलून तीही ब्रीझा पाठोपाठ एक भक्त घेऊन आला. त्यांनी आंनदचा मृतदेह कात्रज नव्या घाटातील मराठे शाही हॉटेलसमोर टाकला. त्याच्या शेजारीच स्कुटर ठेवण्यात आली.
जेणेकरुन त्याचा वाहनाने उडवल्याने मृत्यू झाल्याचा भास होईल. आनंद गुजर याच्या पत्नीच्या नावावर आयडीया कंपनीची एजंन्सी आहे. तिने महाराजांना एक ब्रीझा कारही भेट दिली आहे. तर आनंद गुजर सध्या कोणताही कामधंदा करत नव्हता. मृतदेहाची ओळख पटल्यानंतर काही तासातच आरोपींना अटक केली. या प्रकरणाचा तपास पोलिस निरीक्षक प्रकाश पासलकर व तपास पथकाचे नितीन शिंदे यांनी केली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.