Pune Accidents: 3 महिन्यांत 27 मृत्यू! लोणावळ्यातील ही ठिकाणे ठरली जीवघेणी, प्रशासनाने घेतला मोठा निर्णय

Pune Accidents: पुणे प्रशासनाने धोकादायक पर्यटन स्थळांसाठी सुरक्षा उपायांची यादी तयार केली आहे, ज्यात धोकादायक क्षेत्रांची ओळख आणि सीमांकन, जीवरक्षक आणि बचाव पथकांची उपस्थिती आणि सूचना फलकांची स्थापना यांचा समावेश आहे.
Pune Accidents
Pune AccidentsEsakal

राज्यासह देशभरात पावसाने हजेरी लावली आहे. या दरम्यान वर्षाविहाराचा आंनद घेण्यासाठी अनेक जण धबधबे, धरण, जंगले, आदी ठिकाणी भेटी देतात. यादम्यान अनेक दुर्घटना घडल्याचे चित्र आहे. अशातच रविवारी(ता.३०) पुण्याजवळील लोणावळा या ठिकाणी असलेल्या भूशी धरण परिसरात पर्यटनासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील ५ जणांचा दुर्घटनेत मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी आता जिल्हा प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.

पुणे जिल्हा प्रशासनाने पावसाळ्यात पर्यटकांच्या सुरक्षेसाठी काही निर्णय घेतले आहेत. मंगळवारी, 2 ते 31 जुलै या कालावधीत मावळ तालुक्यातील भुशी धरण आणि पवना धरण परिसरासह अनेक लोकप्रिय स्थळांना भेट देण्यास लोकांना बंदी घालण्यात आली आहे.

प्रशासनाने धोकादायक पर्यटन स्थळांसाठी सुरक्षा उपायांची यादी आधीच तयार केली आहे, ज्यामध्ये धोकादायक क्षेत्रांची ओळख आणि सीमांकन, जीवरक्षक आणि बचाव पथकांची उपस्थिती आणि चेतावणी, सूचना फलकांची स्थापना यांचा समावेश आहे.

Pune Accidents
Pankaja Munde Wealth : पंकजा मुंडेंचा व्यवसाय शेती, नावावर एकही गाडी नाही; किती कर्ज अन् किती संपत्ती? वाचा डिटेल्स

दुर्घटनेनंतर प्रशासनाने उचलली कडक पावले

पुणे जिल्ह्यातील नयनरम्य लोणावळा हिल स्टेशनमधील प्रसिद्ध पिकनिक स्पॉट भुशी धरणाजवळील धबधब्यात एक महिला आणि चार मुले वाहून गेल्याच्या रविवारी घडलेल्या घटनेनंतर पुणे जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी मंगळवारी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, मावळ, मुळशी, आंबेगाव, खेड, जुन्नर, भोर, वेल्हा, इंदापूर आणि हवेली येथे नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय नागरी सुरक्षा संहिता आणि आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 163 लागू करण्यात आले आहे.

Pune Accidents
Weather Update: महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये 6 जुलैपर्यंत अतिवृष्टीचा इशारा, हवामान खात्याने जारी केला अलर्ट

सेल्फी आणि रीलवर बंदी

या आदेशात पाच किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्र येण्यास बंदी घालण्यात आली आहे, लोकांना खोल पाण्यात जाण्यास बंदी घालण्यात आली आहे, यासोबतच या ठिकाणी सेल्फी काढण्यास आणि रील्स काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. उल्लंघन करणाऱ्यांवर BNNS आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई केली जाईल.

Pune Accidents
Manoj Jarange : ड्रोनद्वारे टेहळणी केल्यानंतर मनोज जरांगेंना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी; सकल मराठा समाजाचा रास्ता रोको

अनेक ठिकाणी लादले निर्बंध

मावळ तालुक्यातील भुशी धरण, बेंदेवाडी आणि डाहुली धबधबा तसेच टायगर पॉइंट, लायन पॉइंट आणि राजमाची पॉइंट, सहारा पूल, पवना धरण परिसर, टाटा धरण आणि खंडाळ्यातील घुबड तलाव यासह अनेक ठिकाणी हे निर्बंध लागू केले जाणार आहेत.

मुळशी तहसीलमध्ये, आदेशांमध्ये मुळशी धरण, ताम्हिणी घाट वनक्षेत्र आणि मिल्कीबार धबधबा यांचा समावेश आहे. हवेली तहसीलच्या क्षेत्रात खडकवासला आणि वारसगाव धरण आणि सिंहगड किल्ल्याभोवतीचा परिसर समाविष्ट आहे. आंबेगाव तालुक्यात हा आदेश भीमाशंकर परिसर, डिंभे धरण परिसर आणि कोंढवळ धबधबा परिसराला लागू आहे.

Pune Accidents
Ajit Pawar NCP: अजित पवारांचं ठरलं? लढणार तर 'एवढ्या' जागांवर; राष्ट्रवादीच्या बैठकीत मोठा निर्णय

जुन्नर तहसीलमध्ये माळशेज घाट, स्थानिक धरण, शिवनेरी किल्ला परिसर आणि माणिकडोह यांचा समावेश होतो. भोर आणि वेल्हा तालुक्यांमधील भाटघर धरण परिसर आणि इतर पाणवठे आणि किल्ले क्षेत्राभोवतीच्या झऱ्यांपर्यंत प्रतिबंधात्मक उपायांचा विस्तार आहे. तसेच खेड आणि इंदापूर तालुक्यातील पाणवठे आणि घाट परिसरांचाही समावेश करण्यात आला आहे.

याशिवाय लोणावळा नगरपरिषद आणि मध्य रेल्वेच्या संयुक्त कारवाईत भुशी धरणाजवळील अतिक्रमणविरोधी मोहिमेदरम्यान ६० हून अधिक अनधिकृत दुकाने तोडण्यात आली. सोमवारी जिल्हाधिकारी दिवसे यांनी स्थानिक प्रशासनाला पर्यटनस्थळांच्या आसपासच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. विशेषत: या ठिकाणी पर्यटकांना होणारे अपघात लक्षात घेऊन काही ठिकाणी सुरक्षेच्या उपाययोजना आखण्यात आल्या होत्या.

Pune Accidents
NEET Exam : नीट परीक्षेतील गैरव्यवहारप्रकरणी दोघे सीबीआयच्या ताब्यात; लातूरमधल्या 'त्या' तिघांचं काय आहे कनेक्शन?

गेल्या 3 महिन्यांत 27 जणांचा मृत्यू

पावसाळ्यात, पुणे जिल्ह्यातील पश्चिम घाटातील भुशी आणि पवना धरण, लोणावळा, सिंहगड, माळशेज आणि ताम्हिणी आणि इतर ठिकाणांना मोठ्या संख्येने पर्यटक भेट देतात, अनेकदा अज्ञात आणि धोकादायक भागात जातात.

लोणावळ्यातील पवना धरणाच्या ठिकाणी अनेकदा पर्यटक बुडण्याच्या घटना घडल्या आहेत, ज्यामुळे परिसरात सुरक्षा उपायांची अंमलबजावणी करण्याचे महत्त्व अधोरेखित होते. लोणावळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी 2024 पासून पवना धरणात चार जणांचा बुडून मृत्यू झाला आहे.

वाइल्डलाइफ प्रोटेक्टर मावळ (VRM) सारख्या बचाव संस्थांनी या वर्षी मार्च ते मे दरम्यान मावळ तालुक्यातील विविध पाणवठ्यांमधून 27 मृतदेह बाहेर काढले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी विविध पर्यटन स्थळे जसे की धरणे, धबधबे, तलाव, नद्या आणि खडक या ठिकाणी धोकादायक ठिकाणे ओळखून त्यांना काही निर्बंध आणि चेतावणी, सूचना फलक उभारून प्रतिबंधित क्षेत्रे म्हणून चिन्हांकित करण्यास सांगितले होते जेणेकरून पर्यटक त्यांच्या पलीकडे जाऊ नयेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com