महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोज पाटील

Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti
Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samitisakal
Updated on

पुणे : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या अध्यक्षपदी सरोजताई पाटील यांची निवड झाली आहे. समितीची राज्य कार्यकारी समिती, सल्लागार समिती, सर्व राज्य विभागाचे सदस्य या सर्वांच्या सोमवारी झालेल्या ऑनलाईन राज्य कार्यकारिणी बैठकीमध्ये एकमताने सरोजताईंच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. या नावास महाराष्ट्र अंनिसच्या विश्वस्त मंडळाने ही मान्यता दिली आहे.(Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti)

Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti
मुलीचे अंघोळीचे व्हिडिओ काढणारा कारागृहात

समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर समितीच्या अध्यक्षपदासाठी अनेक कार्यकर्त्यांकडून सरोजताईंचे यांचे नाव सुचविण्यात आले. सरोजताईंनी ही जबाबदारी स्वीकारण्यास मान्यता दिली आहे. सत्यशोधक चळवळीचा विचार मानणाऱ्या कुटुंबात सरोजताईंचा जन्म झाला. सत्यशोधक परंपरेतील विवेकवादी विचार उचलून धरणारे एन. डी. पाटील त्यांना पति म्हणून लाभले. समिती सोबत त्या संघटनेच्या स्थापनेपासून कृतिशील पणे जोडल्या गेलेल्या आहेत. अंनिस संघटनेतील कार्यकर्त्यांशी त्यांचे अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी त्यांचे वैचारिक नाते आहे. सरोजताई रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळच्याही सदस्य आहेत.

Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti
बारामती : सुप्यात तीन वाहनांच्या अपघातात नऊ जखमी

सरोजताई यांनी बी. ए. बी. एड. केल्यानंतरची दहा वर्षे शिक्षक आणि 25 वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम केले. पटसंख्या व गुणवत्ता अशा सर्व आघाड्यांवर मागे पाडलेल्या, वंचित वर्गातील मुलांच्या शाळा गजबजलेल्या व गुणवत्तापूर्ण करण्याचे त्यांनी या शाळेपासून सुरू केलेले काम आजही अखंड चालू आहे. मुलांचा कल ध्यानात घेऊन त्यांना रोजगाराभिमुख करणारे प्रशिक्षण सुरू केले. आजूबाजूच्या समाजातील प्रतिष्ठित लोकांना शाळेशी जोडून घेतले व त्यांच्या सहकार्यातून दरवर्षी 250 मुलामुलींना दत्तक पालक योजनेचा लाभ दिला.

Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti
Sharad Pawar : शरद पवार कोरोना पॉझिटिव्ह! काळजी न करण्याचं आवाहन

या शाळेतील त्यांचे दोन विद्यार्थी आमदार तर दहा विद्यार्थी नगरसेवक झाले आहेत. या कामाची दाखल घेऊन शासनाने त्यांना राज्य पुरस्काराने व मुंबई महापालिकेने महापौर पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. परिसरात झाडे लावणे, जोपासणे यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेतले. या कामासाठी त्यांच्या शाळेला सलग सात वर्षे राज्यपालांच्या हस्ते देण्यात येणारा वृक्ष सन्मित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. निवृत्तीनंतर सरोजताईंनी त्यांचे गाव ढवळी येथील शाळेकडे लक्ष दिले. आज एक हजार लोकसंख्येच्या गावातील या शाळेत आजूबाजूच्या 12 गावांतून मुले येतात. इस्लामपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाच्या त्या सचिव आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.