‘अंनिस’च्या राज्य अध्यक्षपदी सरोज पाटील

समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या सोमवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीत सरोजताईंच्या नावावर शिक्कामोर्तब
Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti
Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samitisakal
Updated on

पुणे : ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या अध्यक्षपदी सरोजताई पाटील यांची निवड करण्यात आली. समितीच्या राज्य कार्यकारिणीच्या सोमवारी झालेल्या ऑनलाइन बैठकीत सरोजताईंच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यास ‘महाराष्ट्र अंनिस’च्या विश्वस्त मंडळानेही मान्यता दिली आहे.(Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti News)

Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीतले सोनिया, प्रियांका स्टार प्रचारक

समितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्यानंतर समितीच्या अध्यक्षपदासाठी अनेक कार्यकर्त्यांकडून सरोजताईंचे यांचे नाव सुचविण्यात आले. सत्यशोधक चळवळीचा विचार मानणाऱ्या कुटुंबात सरोजताईंचा जन्म झाला. सत्यशोधक परंपरेतील विवेकवादी विचार उचलून धरणारे एन. डी. पाटील त्यांना पती म्हणून लाभले. समितीसोबत त्या संघटनेच्या स्थापनेपासून कृतिशीलपणे जोडल्या गेलेल्या आहेत.

अंनिस संघटनेतील कार्यकर्त्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्याशी त्यांचे वैचारिक नाते होेते. सरोजताई रयत शिक्षण संस्थेच्या संचालक मंडळच्याही सदस्य आहेत. सरोजताईंनी बी. ए. बी. एड. केल्यानंतर दहा वर्षे शिक्षक आणि २५ वर्षे मुख्याध्यापक म्हणून काम केले. पटसंख्या व गुणवत्ता अशा सर्व आघाड्यांवर मागे पाडलेल्या वंचित वर्गातील मुलांच्या शाळा गुणवत्तापूर्ण करण्याचे त्यांचे काम अखंड सुरु आहे. मुलांचा कल ध्यानात घेऊन रोजगाराभिमुख प्रशिक्षण त्यांनी सुरू केले. समाजातील प्रतिष्ठित लोकांना शाळेशी जोडून घेत त्यांच्या सहकार्यातून दरवर्षी २५० मुलामुलींना दत्तक पालक योजनेचा लाभ दिला. या शाळेतील त्यांचे दोन विद्यार्थी आमदार, तर दहा विद्यार्थी नगरसेवक झाले आहेत.

Maharashtra Andhashraddha Nirmoolan Samiti
वर्ध्यात कार अपघातात ७ जण ठार; मृतांमध्ये भाजप आमदाराचा मुलगा

"डॉ. एन. डी. पाटील यांनी या पदावर काम केले आहे. त्यांच्या नावाला साजेसे असे हे पद होते. त्यांच्या निधनानंतर कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मला हे पद स्वीकारण्याची वेळ आली. डॉ. पाटील यांनी फार मोठे योगदान या चळवळीसाठी दिले आहे. त्यांचा अभ्यास आणि काम करण्याचा आवाकाही मोठा होता. त्यामुळे या पदावर मी जर काम करणार असले तरी त्यांची जागा घेणे अवघड आहे."

- सरोज पाटील, नवनियुक्त अध्यक्षा, अंनिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.