Baramati Assembly Election: राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला असलेली बारामती पक्षातील फुटीनंत कोणत्या पवारांची हे सिद्ध करणारी विधानसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली आहे. दोन्ही पक्षांकडून मतदारांना भावनिक आवाहन करण्यात येत आहे. अशात अजित पवारांना कुटुंबातूनच आव्हान मिळण्याची शक्यता आहे. अशात पवार कुटुंबातील सदस्य कुणाच्या बाजूने उभे राहणार याचीही उत्सुकता सर्वांना लागली आहे.
दरम्यान यंदा विधानसभा निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबरला मतदान होणार असून 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.