पुणे - विधानसभा निवडणुकीत तिकीट वाटपाचा घोळ, नाराजी नाट्य सुरु असताना दुसरीकडे पुणे शहरातील भाजपचे आमदार, पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये खलबत झाली. यावेळी संघाकडून कशा पद्धतीने रचना लावण्यात आली आहे याची माहिती देण्यात आली. दरम्यान ही मासिक समन्वय बैठक असल्याचे भाजप पदाधिकाऱ्यांनी सांगितले.