माजी मंत्री हर्षवर्धन पाटील राजभवनावर; 'या' विषयावर झाली खलबते

Maharashtra governor
Maharashtra governorsakal media
Updated on

पुणे : राज्याचे (maharshtra governer) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांची भाजप नेते व माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील (harshwardhan patil) यांनी मुंबई (mumbai) राजभवन येथे सदिच्छा (visit) भेट घेतली. शेतकऱ्यांची वीज तोडणी तसेच विद्यार्थी प्रवेश या संवेदनशील विषयांवर चर्चा केली. निरा भीमा कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील (rajwardhan patil) यांच्या उपस्थितीत झालेल्या चर्चेत पाटील यांनी महामहिर राज्यपाल यांना उपरोक्त प्रश्नावरती वैयक्तिक लक्ष घालावे अशी विनंती केली.

यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले, राज्यात सध्या शेतकऱ्यांच्या शेतीपंपाची वीज खंडित करण्याची मोहीम महाविकास आघाडीने सुरू केली आहे. सध्या शेतीपंपांची वीज तोडणी मोहीम सुरु असल्याने शेतातील उभी पिके जळून चालली असून जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍नही निर्माण झाला आहे. शेतकरी बांधव हे कोरोना महामारीमुळे आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत. सध्या प्राप्त परिस्थितीत ते वीज बिलाचे पैसे भरू शकत नाही.

Maharashtra governor
अंध नागरिकांसाठी पुस्तक प्रकाशित; कोविडसह विविध आजारांची माहिती ब्रेल लिपीत

त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेली शेतकरी शेतीपंपांची वीज खंडित मोहिम तात्काळ थांबविणे गरजेचे आहे. तसेच राज्यात वाढलेल्या गुणांमुळे सध्या इयत्ता अकरावी व प्रथम वर्ष पदवीचा प्रवेश प्रश्न जटील बनल्याने विद्यार्थी चिंतेत आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेसंदर्भात सुनिश्चित धोरण ठरवून एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहू नये अशी विनंती राज्यपाल यांना केली असता त्यांनी लक्ष घालण्याचे आश्वासन दिले असल्याचे हर्षवर्धन पाटील व राजवर्धन पाटील यांना सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.