पुणे : आई आजारी असल्याची बतावणी करून राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक करणाऱ्या बंटी-बबलीला पोलिसांनी अटक केली आहे. मुकेश राठोड आणि सुनीता क्षीरसागर असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. मुकेश हा बुलढाण्याचा असून तो शिक्षणासाठी औरंगाबाद येथे आला होता, तर, सुनिता ही मुळची औरंगाबादची आहे. हे दोघेही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. या दोघांनी मिळून आमदार माधुरी मिसाळ, श्वेता महाले, मेघना बोर्डीकर, देवयानी फरांदे या राज्यातील चार महिला आमदारांची फसवणूक केली होती. आमदरांच्या तक्रारीनंतर या प्रकरणी पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आई आजारी होती म्हणून राठोड याने वरील महिला आमदारांना मदत मागितली होती. तसेच ही रक्कम ऑनलाइन माध्यमातून देण्यात आली होती. मात्र हा सर्व प्रकार खोटा असल्याचे आणि आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिला आमदारांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली होती. पैश्याची गरज होती म्हणून त्यांनी महिला आमदारांना भेटून त्यांच्याकडून नंबर मागितला होता. सुनीता क्षीरसागर यांच्या गुगल पे वर सगळा व्यवहार केला होता. हे दोघे ही शेतकरी कुटुंबातून आहे.
नेमका प्रकार काय?
काही दिवसांपूर्वी आमदार माधुरी मिसाळ यांच्या मोबाईल क्रमांकावर मुकेश राठोड या नावाच्या व्यक्तीन संपर्क साधला. "मॅडम मी आपल्या मतदार संघात राहणारा व्यक्ती आहे, माझी आई बाणेर येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहे. तिच्या उपचारांसाठी मला पैशांची गरज आहे.'' अशी बतावणी करीत त्याने मिसाळ यांच्याशी संवाद साधला. आईवर उपचारांसाठी समोरील व्यक्ती फोन करुन भावनिक आवाहन करीत असल्यामुळे मिसाळ यांनीही त्याच्यावर विश्वास ठेवला. त्यानंतर त्याने मिसाळ यांना ऑनलाईन माध्यमाद्वारे पैसे पाठविण्यास सांगितले. त्यानुसार त्यांनी तीन हजार सहाशे रुपये राठोड यास पाठविले.
दरम्यान, मिसाळ या अन्य आमदारांशी बोलत होत्या. त्यावेळी आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे, आमदार देवयानी फरांदे, आमदार श्वेता महाले यांचीही याच पद्धतीने आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती त्यांच्या चर्चेतुन पुढे आली. त्यानुसार, फिर्यादी यांनी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याची प्राथमिक तपासणी केल्यानंतर राठोड व त्याच्या साथीदाराने चारही महिला आमदारांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.