महाराष्ट्रात विकेंद्रित जलव्यवस्थापन गरजेचे; जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्र सिंह

‘स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात बांधली गेली. परंतु, जलसंधारण आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी आवश्यक प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाले.
Dr Rajendrasinh
Dr RajendrasinhSakal
Updated on

पुणे - ‘स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक धरणे महाराष्ट्रात बांधली गेली. परंतु, जलसंधारण आणि भूजल पातळी वाढविण्यासाठी आवश्यक प्रकल्पांकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे महाराष्ट्राला सामूदायिक विकेंद्रित जलव्यवस्थापनाची गरज आहे. त्यातूनच खऱ्या अर्थाने शेती आणि शेतकरी समृद्ध होईल,’ असे प्रतिपादन जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी स्पष्ट केले. राज्यामध्ये कोकणानंतर सर्वाधिक पाऊस विदर्भात पडतो. असे असतानाही नेहमी दुष्काळ आणि शेतकरी आत्महत्यांनी विदर्भ चर्चेत असतो, याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे, असे ते म्हणाले.

जलसंधारणावर गेली ४० वर्षे अविरतपणे कार्य करणारे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी बुधवारी ‘सकाळ’च्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. या वेळी ‘सकाळ’चे मुख्य संपादक श्रीराम पवार, संपादक सम्राट फडणीस यांनी त्यांचे स्वागत केले. राज्यभरातील संपादकीय विभागातील सहकाऱ्यांशी राजेंद्रसिंह यांनी ऑनलाइन संवाद साधला. जलसंधारण, हवामान बदल, नदीसंवर्धन, महाराष्ट्रातील प्रकल्प आदी विषयांवर डॉ. सिंह यांनी स्पष्ट मते मांडली.

Dr Rajendrasinh
पुण्यातील 'त्या' मुलीवर ठाण्यात आणखी एका तरुणाकडून अत्याचार

ते म्हणाले, ‘‘मराठवाड्यात पाण्याची टंचाई असतानाही उसाचे पीक घेतले जाते. बाजारधार्जिण्या पिकपद्धतीमुळे दुष्काळ, अवर्षण, नापिकी आणि पडता बाजारभाव आदी कृषी संकटाचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळीच शहाणे होत मॉन्सूनवर आधारित पीकपद्धतीचा अवलंब करावा.’’ पर्यावरणाच्या संवर्धनासाठी भारतीय ज्ञानपद्धतीचा वापर करणे गरजेचे असून, यासाठी येणाऱ्या पिढीने आपले भवताल समजून घेणे आवश्यक असल्याचेही डॉ. सिंह यांनी सांगितले.

तीर्थस्थळे पर्यटनस्थळे बनू नयेत...

राज्य सरकार तीर्थक्षेत्रांना पर्यटनस्थळांमध्ये विकसित करत आहे. यासाठी तिथे विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. पर्यायाने तेथील जैवपरिसंस्था धोक्यात येत असून, ही क्षेत्रे तीर्थस्थळ म्हणूनच विकसित व्हावी, असे डॉ. सिंह यांनी सांगितले. नाशिक येथील ब्रह्मगिरी पर्वताचा काही भाग जैवसंवर्धन क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.