पुणे : ऑगस्टमध्ये पावसाने सरासरी गाठल्यानंतर सप्टेंबर महिन्यात देशात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात देशात १०९ टक्क्यांपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. विदर्भ, कोकणासह महाराष्ट्राच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.