पुणे: किमान तापमानात घट होऊ लागल्याने राज्यात थंडी हळूहळू वाढत जाण्याचे संकेत आहेत. उत्तर महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा १६ अंशांच्या खाली आल्याने गारठा वाढला आहे. उर्वरित राज्यात अद्याप थंडीची प्रतीक्षा आहे. शनिवारी धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात तापमानातील चढ-उतार सुरूच राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.