पुणे: राज्याच्या किमान तापमानात घट होत असल्याने थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रात पारा १५ अंशांच्या खाली घसरल्याने गारठा वाढला आहे. निफाड येथील गहू संशोधन केंद्र व धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी १३.७ अंश तापमानाची नोंद झाली. कमाल तापमानातील वाढ कायम असल्याने सांताक्रूझ येथे उच्चांकी ३६.३ अंश तापमान नोंदले गेले.