सोमेश्वरनगर : महाराष्ट्र राज्याच्या मंत्री समितीने १५ नोव्हेंबरपासून साखर कारखाने सुरू करण्याचा घेतलेला निर्णय आधीच साखरउद्योगाच्या अंगलट आलेला असताना साखरआयुक्तालयाने त्यावरही कडी केली आहे. हंगामास अवघा एक दिवस उरलेला असताना राज्यातील एकाही साखर कारखान्याला गाळप परवाना दिलेला नाही. यामुळे शुभारंभाची तयारी करून बसलेले कारखाने गॅसवर गेले आहेत तर ऊस उत्पादक अक्षरशः हताश झाले आहेत.