Shirur Lok Sabha Result : महाविकास आघाडीच्या नियोजनबद्ध प्रचाराचा आढळराव पाटलांना दणका

शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दणदणीत पराभव केला.
Ambegaon
Ambegaonsakal
Updated on

- सुदाम बिडकर

शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दणदणीत पराभव केला. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व आढळराव पाटील यांच्या घरच्या आंबेगाव- शिरूर मतदारसंघात आढळराव पाटील यांना मोठे मताधिक्य मिळण्याची आशा होती, परंतु येथे कोल्हे यांनाच ११ हजार ४५० मतांची आघाडी मिळाली.

शिरूर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी महायुतीचे शिवाजीराव आढळराव पाटील यांचा दणदणीत पराभव केला. सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व आढळराव पाटील यांच्या घरच्या आंबेगाव- शिरूर मतदारसंघात आढळराव पाटील यांना मोठे मताधिक्य मिळण्याची आशा होती, परंतु येथे कोल्हे यांनाच ११ हजार ४५० मतांची आघाडी मिळाली.

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांनी आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागात, तसेच शिरूर तालुक्यातील ३९ गावांत राबवलेल्या नियोजनबद्ध प्रचाराने कोल्हे यांना मताधिक्य मिळाले.

सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या निरगुडसर गावात आढळराव पाटील यांना बारा मतांची आघाडी मिळाली. डॉ. कोल्हे यांना एक हजार २४६ व आढळराव पाटील यांना एक हजार २५८ मते मिळाली आहेत.

शरद बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे व आंबेगाव तालुका कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रा. राजाराम बाणखेले, दता गांजाळे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब बाणखेले यांच्या मंचर शहरात आढळराव पाटील यांना एक हजार ८०८ मताधिक्य मिळाले आहे. आढळराव पाटील यांना पाच हजार ४३९ व डॉ. कोल्हे यांना तीन हजार ६३१ मते मिळाली आहेत.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेश भोर यांच्या अवसरी खुर्द- तांबडेमळा गावात कोल्हे पिछाडीवर राहिले. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आनंदराव शिंदे, संतोष भोर यांच्या नियोजनबद्ध प्रचाराने गावात आढळराव पाटील यांना ६०७ मताधिक्य मिळाले.

आढळराव पाटील यांना २८८७ व डॉ. कोल्हे यांना २२८० मते मिळाली आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष देवदत्त निकम यांच्या नागापूर गावात डॉ. कोल्हे यांना २८९ मताधिक्य मिळाले आहे. येथे आढळराव पाटील यांना ३४७ व डॉ. कोल्हे यांना ६३६ मते मिळाली आहेत.

भाजपचे जिल्हा संपर्कप्रमुख जयसिंगराव एरंडे यांच्या कोल्हारवाडी गावात आढळराव पाटील यांना २०३ मताधिक्य मिळाले. येथे आढळराव पाटील यांना ३१८ व डॉ. कोल्हे ११५ मते मिळाली आहेत. कैलासबुवा काळे, सोमनाथ काळे यांच्या घोडेगावमध्ये आढळराव पाटील यांना २३८ ची आघाडी मिळाली.

येथे आढळराव पाटील यांना २६२१ मते मिळाली तर कोल्हे यांना २३८३ मते मिळाली. सचिन भोर यांच्या चासमध्ये कोल्हे यांना २०६ ची आघाडी मिळाली. कोल्हे यांना ६८४ मते पडली, तर आढळराव पाटील यांना ४७८ मते पडली.

बाजार समितीचे सभापती वसंत भालेराव व रमेश कानडे यांच्या कळंब गावात आढळराव पाटील यांना ९९ मतांची आघाडी मिळाली. येथे आढळराव पाटील यांना १५२१; तर कोल्हे यांना १४२२ मते मिळाली.

भीमाशंकर साखर कारखाना असलेल्या पारगाव येथे कोल्हे यांना ४४ मतांची आघाडी मिळाली. येथे कोल्हे यांना १०२८ मते मिळाली, तर आढळराव पाटील यांना ९८४ मते पडली.

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विष्णू हिंगे व शिवसेनेचे जिल्हा संघटक अजित चव्हाण यांच्या अवसरी बुद्रुक मध्ये आढळराव पाटील यांना ३३३ मतांची आघाडी मिळाली. येथे आढळराव पाटील यांना १४१५ मते; तर कोल्हे यांना १०८२ मते पडली.

खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष अनिल वाळुंज यांच्या पोंदेवाडी गावात आढळराव पाटील यांना १६१ मतांची आघाडी मिळाली आढळराव पाटील यांना ५५९ मते तर कोल्हे यांना ३९८ मते पडली.

आढळराव पाटील यांचे समर्थक असलेल्या रवींद्र करंजखेले यांच्या धामणी गावात कोल्हे १०२ मतांनी आघाडीवर राहिले. येथे कोल्हे यांना ८९६ मते मिळाली, तर आढळराव पाटील यांना ७९४ मते पडली. राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष नीलेश थोरात यांच्या शेवाळवाडीत आढळराव पाटील यांना २५४ ची आघाडी मिळाली. आढळराव पाटील यांना ५६२; तर कोल्हे यांना ३०८ मते मिळाली.

आढळराव पाटील समर्थक अरुण गिरे यांच्या मेंगडेवाडीत आढळराव पाटील यांना १४९ची आघाडी मिळाली. आढळराव पाटील यांना ६३४; तर कोल्हे यांना ४८५ मते मिळाली. शिवसेनेचे राज्य विस्तारक सचिन बांगर यांच्या पिंपळगाव (खडकी) येथे कोल्हे यांना २७ मतांची आघाडी मिळाली. येथे कोल्हे यांना १२४५ तर आढळराव पाटील यांना १२१८ मते मिळाली.

शिरूर तालुक्यातील जोडलेल्या गावात दोन- चार गावांचा अपवाद वगळता सर्वच गावात कोल्हे यांना आघाडी मिळाली.

माजी आमदार पोपटराव गावडे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे दामू घोडे यांच्या टाकळी हाजीत कोल्हे यांना ९५७ मतांची आघाडी मिळाली. येथे कोल्हे यांना १९५८, तर आढळराव पाटील यांना १००४ मते मिळाली. राष्ट्रवादीचे मानसिंग पाचुंदकर व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शेखर पाचुंदकर यांच्या रांजणगावमध्ये कोल्हे यांना ९७८ मतांची आघाडी मिळाली.

येथे कोल्हे यांना २७४७ ते आढळराव पाटील यांना १७६९ मते पडली, डॉ. सुभाष पोकळे यांच्या कवठे येथे कोल्हे यांना ५२९ ची आघाडी मिळाली. कोल्हे यांना १८३५, तर आढळराव पाटील यांना १३०६ मते पडली. राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पश्चिम आदिवासी पट्ट्यातील शिनोली- बोरघर जिल्हा परिषद गटात कोल्हे यांना ३९१४ मतांची आघाडी मिळाली.

त्यापैकी आमोंडी गणात १६८७; तर शिनोली गणात २२२७ आघाडी मिळाली. आढळराव पाटील यांच्या घरच्या घोडेगाव- पेठ गटात अपेक्षेप्रमाणे आढळराव पाटील यांना ४०६० मतांची आघाडी मिळाली. घोडेगाव गणात ६१६; तर पेठ गणात ३४४६ची आघाडी मिळाली. कळंब- चांडोली जिल्हा परिषद गटात आढळराव पाटील यांना ५३६ची आघाडी मिळाली.

चांडोली गणात कोल्हे यांना ४६८; तर कळंब गणात आढळराव पाटील यांना १००४ची आघाडी मिळाली. मंचर अवसरी जिल्हा परिषद गटात आढळराव पाटील यांना तीन हजार ५३२ मतांची आघाडी मिळाली. यातील मंचर गणात दोन हजार ७२७ तर अवसरी खुर्द गणात ८०५ ची आघाडी मिळाली.

सहकारमंत्री वळसे पाटील यांच्या पारगाव- अवसरी बुद्रुक जिल्हा परिषद गटात आढळराव पाटील यांना ४९ मतांची तुटपुंजी आघाडी मिळाली. पारगाव गणात कोल्हे यांना ११०० मतांची आघाडी, तर अवसरी बुद्रुक गणात आढळराव पाटील यांनी ११४९ मतांची आघाडी मिळाली. या मतदारसंघाला जोडलेल्या शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी- कवठे गटात कोल्हे यांना ७४०३ मतांची आघाडी मिळाली.

टाकळी हाजी गणात ४९४२ची व कवठे गणात २४६१ची आघाडी कोल्हे यांनी मिळाली. रांजणगाव- कारेगाव गटात कोल्हे यांना ४७६६ ची आघाडी मिळाली. रांजणगाव गणात १९४९ ची; तर कारेगाव गणात २८१७ ची आघाडी मिळाली. पाबळ- केंदूर गटात कोल्हे यांना ४०४४ मतांची आघाडी मिळाली. पाबळ गणात २३०८ ची आघाडी, तर केंदूर गणात १७३६ आघाडी मिळाली.

दृष्टिक्षेपात

  • आंबेगाव तालुक्यातून आढळराव पाटील यांना चार हजार २६३ मतांची आघाडी.

  • शिरूर तालुक्यातील गावातून कोल्हे १५ हजार ७१३ मतांची आघाडी.

  • संपूर्ण विधानसभा मतदारसंघातून कोल्हे यांना ११ हजार ४५० मतांची आघाडी.

  • मतदारसंघातील एकूण आठ जिल्हा परिषद गटांपैकी चार गटात कोल्हे यांना; तर चार गटांत आढळराव पाटील यांना आघाडी.

  • शिरूर तालुक्याच्या गावांतील तीन जिल्हा परिषद गटांत कोल्हे यांना मोठ्या मताधिक्याने आघाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.