Pune News : महिला अत्याचाराच्या घटनाप्रकरणी महाविकास आघाडीकडुन आंदोलनाद्वारे सरकारचा निषेध

'लाडक्‍या बहिणींना न्याय द्या, बहिणीच्या लेकीला सुरक्षा द्या', 'चिमुकल्यानो माफ करा, आपले सरकार आपले रक्षण करु शकत नाही',
Agitation
Agitationesakal
Updated on

पुणे - 'लाडक्‍या बहिणींना न्याय द्या, बहिणीच्या लेकीला सुरक्षा द्या', 'चिमुकल्यानो माफ करा, आपले सरकार आपले रक्षण करु शकत नाही', 'पुणेकरांना काय हवय, महिला सुरक्षा', गृहमंत्र्यांचे लक्ष सत्तेवर, कायदा सुव्यवस्था वाऱ्यावर', 'नराधमांना फाशी द्या', अशा जोरदार घोषणा देत महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी राज्य सरकारचा निषेध केला. खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सरकारविरुद्ध घोषणा दिल्या.

पुणे शहर व परिसरात महिलांवरील वाढत्या अन्याय-अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्‍वभूमीवर महिलांच्या सुरक्षेबाबत सरकारला जाब विचारण्यासाठी महाविकास आघाडीच्यावतीने मंगळवारी सकाळी दहा वाजता टिळक चौकात तीव्र आंदोलन करण्यात आले.

यावेळी खासदार सुळे, कॉंग्रेसचे नेते मोहन जोशी, रमेश बागवे, राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर प्रमुख संजय मोरे, गजानन थरकुडे यांच्यासह तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.

अरविंद शिंदे म्हणाले, 'शहरात रोज गुन्हेगारीचे प्रमाण वाढले. तरुणीवर सामुहिक बलात्कार होतो, शालेय मुलांवर लैंगिक अत्याचार होतो. शाळेबाहेर व शाळेमध्येही असुरक्षित वातावरण निर्माण झाले आहे. महिला कुठेही सुरक्षित नाहीत. पोलिस खाते निष्क्रीय खाते झाल्यामुळे गुन्हेगारी वाढली आहे. पोलिस आयुक्तांना घेराव घातल्याशिवाय प्रश्‍न सुटणार नाही.'

जगताप म्हणाले, "पुणे शहरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होऊनही सरकारला गांभीर्य नाही. अजुनही आरोपींना अटक करण्यात आलेली नाही. इतक्‍या गंभीर घटना घडूनही पोलिस प्रशासन उदासीन आहे. महिलांवरील अत्याचाराच्या घटना थांबत नाहीत, तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही.'

मोरे म्हणाले, "पुण्यासारख्या शहरामध्ये महिला, शालेय विद्यार्थीनी, तरुणींबाबत लैंगिक अत्याचाराच्या घटना घडत आहेत. बोपदेव घाटातील बलात्कार प्रकरणातील आरोपींना अजूनही अटक झालेली नाही. पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक नसल्यामुळे या घटना घडत आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्था बिघडली आहे.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.