Mahavitaran Abhay Yojana 2024 : जागेची मालकी बदलली तरी वीजबिल थकबाकी भरणे अनिवार्य; अभय योजनेतून ४६.७३ लाख ग्राहकांना थकबाकीमुक्तीची संधी

जागेची मालकी बदलली तरी वीजबिलांची थकबाकी भरणे अनिवार्य असून ही थकबाकी जागेच्या नवीन मालकाकडून किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार महावितरणला आहे.
mahavitaran abhay yojana 2024
mahavitaran abhay yojana 2024sakal
Updated on

निरगुडसर - जागेची मालकी बदलली तरी वीजबिलांची थकबाकी भरणे अनिवार्य असून ही थकबाकी जागेच्या नवीन मालकाकडून किंवा ताबेदाराकडून वसूल करण्याचा अधिकार महावितरणला आहे. या पार्श्वभूमीवर थकीत वीजबिलामुळे कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित झालेली घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व इतर जागा थकबाकीमुक्त करण्याची संधी महावितरण अभय योजना २०२४ मध्ये उपलब्ध झाली आहे. यात पुणे परिमंडलातील २ लाख ५३ हजार ३७४ वीजग्राहकांना फायदा होणार असून मूळ थकबाकीचा भरणा केल्यास व्याज व विलंब आकाराचे एकूण ७३ कोटी १४ लाख रुपये माफ होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.