Pune News : सोलापूरचा महेंद्र गायकवाड ठरला सेनाकेसरी

येथील हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळवर मात करीत सेनाकेसरी होण्याचा बहुमान पटकावला.
Pune
Pune sakal
Updated on

हडपसर : येथील हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे क्रीडांगणावर झालेल्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील अंतिम लढतीत सोलापूरच्या महेंद्र गायकवाडने पुण्याच्या पृथ्वीराज मोहोळवर मात करीत सेनाकेसरी होण्याचा बहुमान पटकावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना शहरप्रमुख प्रमोद भानगिरे यांनी या स्पर्धेचे आयोजन केले होते.

चार दिवस चाललेल्या या सेनाकेसरी स्पर्धेत राज्याच्या विविध भागातील सहाशे मल्ल स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. पुण्याचा पृथ्वीराज मोहोळ व सोलापूरचा महेंद्र गायकवाड या दोघांमध्ये अंतिम अटीतटीची लढत झाली. त्यामध्ये मल्ल मोहोळवर मात करीत गायकवाड सेनाकेसरी स्पर्धेचा मानकरी ठरला.

शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले, म्हाडाचे अध्यक्ष माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, शिवसेना उपनेते इरफान सय्यद, शहर प्रमुख प्रमोद भानगिरे, बाळासाहेब भानगिरे आदी मान्यवरांच्या हस्ते विजयी मल्ल गायकवाड याला पाच लक्ष रूपये रोख इनामासह, सेनाकेसरी किताब, सुपर बुलेट गाडी आणि मानाची चांदीची गदा तर, उपविजेता मल्ल मोहोळ याला तीन लक्ष रूपये रोख व उपसेनाकेसरी किताब देवून गौरविण्यात आले. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या मान्यतेने या स्पर्धा झाल्या.

शिवसेना जिल्हाप्रमुख रमेश कोंडे, युवा सेना राज्य सचिव किरण साळी, युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे, युवासेना शहरप्रमुख निलेश गिरमे, महिला आघाडी शहर प्रमुख पूजा रावेतकर, शहर संघटक श्रीकांत पुजारी, लक्ष्मण आरडे, सुनिल जाधव, राजाभाऊ भिलारे, संतोष राजपूत, अभिजीत बोराटे, नाना तरवडे, राजेंद्र भानगिरे, अभिमन्यू भानगिरे, उपमहाराष्ट्र केसरी अशोक माने, करण भानगिरे, प्रज्वल भानगिरे, आकाश भानगिरे अमर घुले, विकी माने, दिपक कुलाळ, नितीन लगस यांनी संयोजन केले.

"राज्यात कुस्तीला मोठी पंरपरा आहे. ही परंपरा टीकून राहवी, नव्या पिढीसमोर त्याचे उदात्तीकरण व्हावे आणि राजाश्रयातून कुस्तीचा आणखी प्रचार प्रसार व्हावा, यादृष्टीने मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून या स्पर्धेचे आयोजन केले होते. या पुढेही अशा विविध क्रीडा स्पर्धा घेऊन नव्या पिढीला आवड निर्माण केली जाईल.'

प्रमोद भानगिरे

शहर शिवसेना प्रमुख (शिंदे गट)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()