मतदारांनो, तुम्ही जे पेरलंय तेच उगवलंय...

ambulance.jpg
ambulance.jpg
Updated on

पुणे : पुण्यात सायरन वाजणं बंद झालय, आता आवाज येतोय फक्त अॅम्ब्युलन्समधून जे हृदय शेवटची घटका मोजतय त्याच्या ठोक्यांचा..., मला वाचवा, मला वाचवा या किंकाळ्यांचा.... कोणाला ऑक्सिजन मिळत नाहीतर कोणाला हॉस्पिटलवाले भरती करून घेत नाहीत. तर कोणाला तुझा मेडिक्लेम आहे का असा प्रश्न विचारून तासन्- तास हॉस्पिटलच्या बाहेर रुग्णाला मृत्यूच्या दारातून बाहेर येण्यासाठी धडपड करावी लागत आहे. तर कोणाकडे पैसे नसल्याने तो घरीच तडफडून मृत्यू पावतो आहे.

पुणे शहरात कोविड सेंटरमध्ये उभारण्यात आलेली शौचालये स्वच्छ नाहीत. प्यायला पुरसे पाणी नाही, सॅनिटायझरची कमतरता आहे, अशा स्वरूपाच्या तक्रारी या डॉक्‍टरांनी केल्या आहेत. या डॉक्‍टरांना समजावताना आधिकारी औषधे लवकरच मिळतील. सध्या आहे त्या परिस्थितीत मॅनेज करा असा सल्ला देत आहेत. काही औषधांची कमतरता केवळ पुण्यातच नव्हे तर देशभरात आहे. आम्ही प्रयत्न करीत आहोत. महापालिकेकडून ही सारी औषधे मिळत नाहीत. त्यांच्याकडेही औषधांचा तुटवडा असल्याचे या आधिकाऱ्यांनी सांगितले. डॉक्‍टरकडून अडचणींचा पाढा वाचला जात असताना आधिकारी फक्त प्रयत्न सुरू आहेत. औषधे लवकरच मिळतील, असे सांगत आहेत. सेंटरमध्ये काम करणाऱ्या डॉक्‍टर व कर्मचाऱ्यांना पुरेशा सुविधा मिळत नसतील तर रूग्णांना काय उपचार मिळणार अशी स्थिती असल्याने या सेंटरमध्ये दाखल करण्यात आलेल्या रूग्णांचे नातेवाईक पुरते धास्तावले आहेत.

राज्याची आरोग्य व्यवस्था तर बोलायलाच नको..ही परिस्थितीत फक्त पुण्यात नाहीतर देशभर झाली आहे. तरी बेजबाबदारपणे शासक वर्ग वागत आहे. का त्यांना त्यांची जबाबदारी कळत नसेल, यामध्ये नेमकं दोषी कोण, याला जबाबदार कोण असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. आज महाराष्ट्र व देशातील जे चित्र आहे. ते अतिशय वेदनादायी आहे. कोणताही पक्ष, कोणताही लोकप्रतिनिधी देशात कोरोनाने मृत्यूचे थैमान घातला असताना त्याच्यावर लक्ष देण्याऐवजी अनावश्यक गोष्टीकड़े लोकांचे लक्ष वळवत आहेत. नाही त्या प्रकरणाला उथळ करून नागरिकांचा  एका म्हणीप्रमाणे टांगा पलटी... घोडे फरार असा प्रकार चालू केला आहे. देशातील अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे . लोकांचं जगणं रस्त्यावर आले आहे. करोडोंच्या संख्येने नागरिक उपाशीपोटी झोपत आहे. तरुणांना उद्याच्या भविष्याची चिंता लागून राहिली आहे . ज्येष्ठ नागरिकांचे हाल तर  विचारायलाच नको .....

मृत्यूच् तांडव सुरू असताना सर्वांना सुशांत सिंह आणि कंगना याच्याशिवाय दुसरं काही सुचेनासे झालं आहे. कोण आहेत हे सुशांत आणि कंगना हे क्रांतिकारक तर नाहीत ना ... ज्या तडफेने महाविकास आघाडी कंगना विरुद्ध मैदानात उतरली आहे.  त्याचवेळी  महाराष्ट्रातील जनता जीव मुठीत घेऊन जगत असताना त्यांच्यासाठी तुमची ताकद खर्च करा अशी जनतेची माफक अपेक्षा तुमच्याकडून आहे. बाकीचे धंदे बंद करा आणि लोकांच्या या प्रश्नावर लक्ष द्या अशी सर्वसामान्यांची तीव्र मागणी होत आहे. महाराष्ट्रातील जनतेसाठी ना कंगना राणावत महत्वाची आहे.  ना सुशांत सिंह प्रकरण महत्त्वाच आहे. राज्यात पडत असलेले मृतदेह ओलांडून तुम्ही याला ठोकतो, याला अडवतो, याने मंबईत येऊ नये अश्या ज्या मर्दानगीच्या गप्पा तुम्ही चालवत आहात त्या बंद करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.