पुणे - प्रमुख सहा रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ सुरू करण्याचा प्रस्ताव महापालिकेने राज्य सरकारकडे जुलैमध्ये पाठविला. त्यास अद्यापही मान्यता मिळालेली नाही.
शहरात वाहनांची संख्या वाढत असून पार्किंगसाठी जागा मिळत नाही. अनेकदा जागा शोधत वाहनचालकांना इच्छितस्थळापासून लांब गाडी लावावी लागते. विशेषतः चारचाकी वाहनचालकांची मोठी अडचण होते. त्यामुळे महापालिकेने २०१८मध्ये प्रमुख रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यात पार्किंगसाठी झोन तयार केले.