केडगाव - १४१ विमान प्रवाशांच्या जीव वाचविणा-या मैत्रेयी श्रीकृष्ण शितोळेचे जगभरात कौतुक झाले. गावच्या लेकीचे अप्रुप कुसेगावकरांना नसेल तरच नवल. मैत्रेयी दोन दिवसांच्या सुटीसाठी घरी आली अन् तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला.
मैत्रेयीच्या विमानाने तिरूचिरापल्ली ( तामीळनाडू ) येथील विमानतळावरून उड्डाण घेतले. ३६ हजार फुट उंचीवर असताना तीच्या लक्षात आले की विमानाची हायड्रोलिक यंत्रणा काम देत नाही. विमानाला तातडीने खाली उतरावे लागणार होते.