Government Scheme : राज्यातील पात्र महिलांना 46 हजार कोटी रुपये सरकार उपलब्ध करुन देणार : अजित पवार

राज्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी तसेच जनतेच्या कल्याणासाठी महायुती सरकार कटिबध्द आहे.
Majhi ladki Bahin Yojana Ajit Pawar
Majhi ladki Bahin Yojana Ajit Pawaresakal
Updated on
Summary

लोकसभा निवडणुकीच्या वेळेस चुकीचा नरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न केला. विधानसभेला मात्र अशा चुकीच्या नरेटिव्हला बळी पडू नका, असेही आवाहन अजित पवार यांनी केले.

बारामती : राज्याच्या सुरक्षित भवितव्यासाठी तसेच जनतेच्या कल्याणासाठी महायुती सरकार कटिबध्द असून समाजातील सर्वच घटकांना पुरेसा न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल. अर्थसंकल्पातून जनसन्मानाचीच भूमिका राज्य सरकारने घेतली असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने बारामतीत आज (रविवार) आयोजित जनसन्मान मेळाव्यात अजित पवार बोलत होते. प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, खासदार प्रफुल्ल पटेल व सुनेत्रा पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, अनिल पाटील, धर्मराव अत्राम, संजय बनसोडे, रामराजे नाईक निंबाळकर, रुपाली चाकणकर यांच्यासह अनेक आमदार व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.

Majhi ladki Bahin Yojana Ajit Pawar
'महायुती-मविआ'कडून छोट्या राजकीय पक्षांना संपविण्याचा प्रयत्न; जयंत पाटलांच्या पराभवानंतर राजू शेट्टींचा आरोप

अजित पवार म्हणाले, अर्थसंकल्पात मांडलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कार्यान्वित केलेली असून या माध्यमातून राज्यातील पात्र महिलांना 46 हजार कोटी रुपये राज्य सरकार उपलब्ध करुन देणार आहे. महिलांसह शेतकरी, विद्यार्थी, वारकरी, दुर्बल घटकांसाठीही अर्थसंकल्पात सरकारने काही तरी देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पायाभूत सुविधा निर्मितीसह अन्य क्षेत्रातील महत्त्वाच्या योजनांना गती दिली जाणार आहे. उसाची एमएसपी (किमान विक्री किंमत) वाढविण्याबाबत केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांना विनंती केली असून त्यांना उद्याच लेखी निवेदन देणार आहे. कांदा आयात केलेला नसल्याचेही त्यांनी नमूद केले.

Majhi ladki Bahin Yojana Ajit Pawar
Maratha Reservation : 'जरांगे नावाच्या भुताला मुख्यमंत्र्यांनी बाटलीत बंद करावं आणि समुद्रात फेकून द्यावं'; हाकेंची सडकून टीका

''चुकीच्या नरेटिव्हला बळी पडू नका..''

लोकसभा निवडणुकीच्या वेळेस चुकीचा नरेटिव्ह पसरविण्याचा प्रयत्न केला. विधानसभेला मात्र अशा चुकीच्या नरेटिव्हला बळी पडू नका, असेही आवाहन अजित पवार यांनी केले. राज्य सरकार ग्राहकांचे हित जोपासण्यासोबतच शेतक-यांच्या मालालाही योग्य भाव मिळायला हवा याची काळजी घेत असल्याचा उल्लेख त्यांनी केला. भावनिक होऊ नका, प्रश्न सोडविण्यासाठी विकासाच ध्येय डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करावी लागते, असेही त्यांनी नमूद केले.

पावसाने माहोलच बदलला....

या सभेच्या सुरवातीपासूनच पावसाच्या सरी कोसळत होत्या. अजित पवार यांचे भाषण सुरु होतानाच पावसाला प्रारंभ झाल्यावर कार्यकर्ते पावसात भिजत असल्याचे पाहून स्वत: अजित पवार व्यासपीठावर समोर आले व पावसात उभे राहून त्यांनी भाषण सुरु केले. त्यांच्यासमवेत मंत्रीमंडळातील सर्वच मंत्री त्यांच्या बाजूला येऊन पावसात उभे राहिले, त्या नंतर कार्यकर्त्यांनी एकच वादा अजितदादा अशा घोषणा सुरु केल्या. सर्वच मान्यवर पावसातच अजित पवार यांचे भाषण होईपर्यंत थांबून होते.

राज्यात राष्ट्रवादीची जनसंवाद यात्रा...

राज्याच्या विविध भागात अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन केले जाणार असल्याचे सुनिल तटकरे यांनी या वेळी नमूद केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com