जात पडताळणी समित्यांचे कार्य पारदर्शक करणार; धम्मज्योती गजभिये

पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे कार्य अधिक पारदर्शक होण्यासाठी ऑनलाइन सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करावेत.
barti organisation
barti organisationSakal
Updated on

पुणे - जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांचे कार्य अधिक पारदर्शक होण्यासाठी ऑनलाइन सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक बदल करावेत. लॉकडाऊन कालावधीत यूपीएससी आणि एमपीएससीचे ऑनलाइन प्रशिक्षण नियमितपणे सुरू ठेवण्यात यावे, अशा सूचना डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) संस्थेचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिल्या.

बार्टी संस्थेचे महासंचालक गजभिये हे वैद्यकीय रजेवर गेले होते. त्यामुळे दि.रा. डिंगळे यांच्याकडे प्रभारी महासंचालकपदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. गजभिये यांनी सोमवारी (ता. २०) महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. यानंतर त्यांनी संस्थेतील विभाग प्रमुखांची आढावा बैठक घेतली.

barti organisation
पुण्यातील गिर्यारोहकांनी रचला नवा अध्याय

येरवडा येथे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी प्रशिक्षण केंद्र कार्यान्वित करावे. जिल्हास्तरावर सामाजिक न्याय भवनात बार्टीमार्फत प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात यावे. जात प्रमाणपत्र पडताळणी समिती स्तरावरील दस्तऐवज डिजिटाइज्ड करण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी. पासपोर्टच्या धर्तीवर जात प्रमाणपत्र पडताळणी प्रक्रिया राबविण्याचे धोरण राबविण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

तसेच, दहावीत ९० टक्के मार्क घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी बार्टीमार्फत सुरू असलेल्या अनुदान योजनेची अंमलबजावणी त्वरित करावी. स्वयंसहायता युवा गट अनुसूचित जाती प्रवर्गाच्या व्यक्तींमध्ये उद्योजकता वाढवण्यासाठी राज्यामध्ये ५० हजार स्वयं सहाय्यता युवा गट स्थापन करण्यात येत आहेत. याबाबत अंमलबजावणी त्वरित करावी, असे निर्देश गजभिये यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.