माळेगाव - माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सन २०२३-२४ या ऊस गळीत हंगामाचा अंतिम दर ३६३६ रुपये प्रतिटन इतका जाहिर केला. त्यामुळे ऊस उत्पादक सभासदांना एफआरपीपेक्षा तब्बल ८०५ रुपये अधिक मिळणार आहेत.