माळेगाव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे जिल्ह्यात सहकारी साखर कारखानेही राज्यात विक्रमी दर देण्याची परंपरा जोपासतात. हे बारामतीत माळेगाव व सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यांनी दाखवून दिले.
माळेगावचा ३६३६, तर सोमेश्वरचा ३५७१ या उच्चांकी ऊस दरामुळे राज्यात सहकारी व खासगी साखर कारखान्यांमध्ये ऊस दराची स्पर्धा सुरू आहे. ती स्पर्धा शेतकऱ्यांच्या फायद्याची ठरत आहे, असे प्रतिपादन माळेगाव कारखान्याचे अध्यक्ष अॅड. केशवराव जगताप यांनी केले.