malegaoun
malegaounsakal

Malegaon Sugar Factory : सत्तेच्या सारीपाटात केशवराव जगताप यांनी मारली बाजी 

`माळेगाव`च्या अध्यक्षपदी केशवराव जगताप, तर उपाध्यक्षपदी तानाजी देवकाते 
Published on

माळेगाव - उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नेतृत्व असलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याची अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक आज बिनविरोध पार पडली. सहकार क्षेत्राचा दांडगा अनुभव असलेले अॅड.केशवराव सर्जेराव जगताप (रा. पणदरे) यांची माळेगाव कारखान्याच्या अध्यक्षपदी निवड झाली, तर उपाध्यक्षपदी तानाजी नामदेव देवकाते (रा. नीरावागज) यांना सर्वानुमते काम करण्याची संधी देण्यात आली.

बारामतीसह राज्यात राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षात दोन गट पडल्यानंतरही बारामतीमध्ये अजित पवार यांचेच राजकियदृष्ट्या वर्चस्व असल्याचे वरील निवडणूकीवरून स्पष्ट होते. दुसरीकडे, माळेगावच्या सत्तेच्या सारीपाटात केशवराव जगताप यांनी अध्यक्षपदी बाजी मारल्याने शेकडो कार्य़कर्त्यांनी गुलालाची मुक्त उधळण केली. फटाक्यांची अतषबाजी केली. ``एकच वादा..अजितदादा,`` अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.  

माळेगावचे मावळते अध्यक्ष बाळासाहेब तावरे यांनी आपला साडेतीन वर्षाचा कार्य़काळ पुर्णत्वाला आल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजिनामा दिली होता, तसेच उपाध्यक्ष सागर जाधव यांनीही एक वर्षाचा ठरवून दिलेला कार्य़काळ पुर्ण झाल्यानंतर राजिनामा  दिला होता.त्यानुसार निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडेकर, कार्य़कारी संचालक अशोक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी संचालक मंडळाची बैठक पार पडली.

malegaoun
Pune Festival 2023 : पुणे फेस्टिव्हलच्या मेजवानीस प्रारंभ

त्यावेळी राष्ट्रवादी काॅग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदासाठी अॅड. केशवराव जगताप, तर उपाध्यक्षपदी तानाजी देवकाते यांची नावे जाहिर केली. त्यानुसार उपस्थित संचालक मंडळाने वरील नावांना सहमती दर्शवित वरील निवडणूक बिनविरोध केली व श्री. जगताप यांना अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी श्री. देवकाते यांना काम करण्याची संधी दिली. यावेळी मावळते अध्यक्ष श्री.तावरे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व भविष्याचा विचार करून अजितदादांनी संबंधितांना संधी दिल्याचे सांगितले. 

malegaoun
Pune Rain News : पूर्व आंबेगावातील काठापूर बुद्रुक परिसरात काल ढगफुटी एकाच दिवसात १५० मिलीमीटर पाऊस शेतीचे नुकसान

यावेळी श्री.तावरे म्हणाले,`` अध्यक्षपदाच्या कारर्किदीमध्ये पवारसाहेब, अजितदादा यांच्या मार्गदर्शाखाली माळेगावची होत असलेली विकासाची घौडदौड पाहून सभासदांना अभिमान वाटतो आहे. त्याचाच एक भाग विचारात घेता  गतवर्षी गाळप झालेल्या ऊसाला माळेगावने राज्यात प्रथम क्रमांकाचा प्रतिटन ३४११ अंतिम दर शेतकऱ्यांना जाहिर केला आहे. सभासदांना अधिकचे दोन पैसे देणे आणि संस्थेची अर्थिक क्षमता भक्कम ठेवण्यात संचालक मंडळ यशस्वी झाले आहे. यापुढील काळात नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्षांना सर्वतोपरी माझे सहकार्य़ राहिले,`` अशी ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी संचालक तानाजी कोकरे, बन्शीलाल आटोळे, रंजन तावरे, संजय काटे, योगेश जगताप, सुरेश खालटे, अनिल तावरे, मदनराव देवकाते, प्रताप आटोळे, नितीन सातव, गुलाबराव  गावडे, राजेंद्र ढवाण, स्वप्नील जगताप,  संगिता कोकरे, अलका पोंदकुले, तानाजी नामदेव देवकाते, मंगेश जगताप, नितीन जगताप, सुरेश देवकाते, पंकज भोसले, कार्य़कारी संचालक अशोकराव पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.

malegaoun
Baramati News : बारामतीत समाधानकारक पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त...

तावरेंचे ४५ वर्षांचे पर्व लक्षवेधी...

अजित पवार यांची सत्ता असो अथवा विरोधक माजी अध्यक्ष चंद्रराव तावरेंची, माळेगाव साखर कारखान्याचा अध्यक्ष तावरे आडनावाचाच असतो. हे राजकिय समिकरण गेली ४५ वर्षे सुरू होते. अर्थात तावरे यांची ही कारकिर्द कारखान्याच्या जडणघडणीमध्ये लक्षवेधी ठरली आहे. अर्थात तावरें हे पर्व शनिवारी संपुष्ठात आले. माजी अध्यक्ष कै. श्रीरंग जगताप यांच्यानंतर तब्बल ५३ वर्षानंतर अॅड.केशवराव जगताप यांच्या माध्यमातून पणदरेला अध्यक्षपदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. 

...नवनिर्वाचित अध्यक्षांचे आवाहन...

दुष्काळी परिस्थितीमुळे आगामी ऊस गळीत हंगामात माळेगावसह सर्वांनाच आव्हानात्मक ठरणार आहे. उसाची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावणार आहे. माळेगावला मुळातच उसाचे कार्य़क्षेत्र मर्य़ादित आहे. या प्रतिकूल स्थितीवर मात करून माळेगाव कारखान्याने १० लाख टनापेक्षा अधिकचे ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. यापुढील काळात सभासदांना अधिकचा ऊस दर देणे, इथेनाॅल प्रकल्पाचे विस्तारिकरण करणे, कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविणे आदी कामांवर लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. त्याकामी संचालक मंडळ, कामगार आणि सभासदांचे सहकार्य़ मिळावे, असे आवाहन नवनिर्वाचित अध्यक्ष अॅड.केशवराव जगताप यांनी केले. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()