Clean City Malegaon: स्वच्छ व सुंदर शहारांच्या यादीत माळेगावला प्रथम क्रमांक मिळेल; मुख्याधिकाऱ्यांना विश्वास

मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या हस्ते या स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम शुक्रवार पार पडला.
छायाचित्र : माळेगाव (ता.बारामती) : नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मिशन क्लीन सिटीमधील यशस्वी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.
छायाचित्र : माळेगाव (ता.बारामती) : नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मिशन क्लीन सिटीमधील यशस्वी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.
Updated on

माळेगाव : स्वच्छ व सुंदर शहरांना केंद्र व राज्य सरकारकडून अधिकाधिक अनुदान देण्याचं धोरण आहे. गतवर्षी राज्यात द्वितीय क्रमांक मिळविलेल्या माळेगाव (ता.बारामती) शहरानं स्वच्छतेचं गुणांकन सुधारण्याचा प्रयत्न करावा, तसं झाल्यास निश्चितच माळेगाव नगरपंचायत राज्यात प्रथम क्रमांकाने सन्मानित होईल, असा विश्वास माळेगावच्या तत्कालिन मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी व्यक्त केला.

छायाचित्र : माळेगाव (ता.बारामती) : नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मिशन क्लीन सिटीमधील यशस्वी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.
Shrikant Shinde on Ganpat Gaikwad: उमेदवारी जाहीर झाल्यानंतर श्रीकांत शिंदेंचा गणपत गायकवाडांवर हल्लाबोल; म्हणाले, गुंड प्रवृत्ती...

माळेगाव बुद्रूक (ता. बारामती) नगरपंचायत प्रशासन व शिवनगर विद्या प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने 'स्वच्छ सर्वेक्षण अभियान व माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत गतवर्षी मिशन क्लीनसिटी स्पर्धा यशस्वीरित्या राबवली होती. तत्कालिन मुख्याधिकारी स्मिता काळे यांच्या हस्ते या स्पर्धेचा बक्षिस वितरण कार्यक्रम शुक्रवार (ता.५) रोजी पार पडला, यावेळी त्या बोलत होत्या.

छायाचित्र : माळेगाव (ता.बारामती) : नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मिशन क्लीन सिटीमधील यशस्वी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.
Rohit Pawar and Crab: 'त्या' खेकड्याचं नेमकं काय केलं? रोहित पवारांनी स्पष्टीकरण देताना भाजपला धरलं धारेवर

मिशन क्लीन सिटी स्पर्धेत माळेगाव बुद्रुक परिसरातील सार्वजनिक भाग सुशोभीकरण करण्यावर भर देण्यात आला होता. या स्पर्धेत शिनवगर विद्या प्रसारक मंडळाच्या विविध शाखेतील प्रत्येकी अकरा विद्यार्थीच्या टिमने सहभाग घेतला होता. या टीमने लोकसहभागातून पुरेसा निधी उपलब्ध केला आणि सुशोभिकरणाच्या कामाला खर्च केला. परिणामी या स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या ९ टीमचे दरम्यानच्या कालावधीत पारदर्शक परिक्षण करण्यात आले. त्यानुसार प्रथम क्रमांक मिळणाऱ्या टिमला तीस हजार रुपये, द्वितीय क्रमांकास वीस हजार रुपये व तृतीय क्रमांकास दहा हजार रुपये बक्षीस देण्यात आले.

छायाचित्र : माळेगाव (ता.बारामती) : नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मिशन क्लीन सिटीमधील यशस्वी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.
Shrikant Shinde: कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना उमेदवारी मिळणार की नाही? फडणवीसांनी अखेर स्पष्टच सांगितलं

तसेच त्यामध्ये ट्रॉफी व प्रमाणपत्राचा समावेश होता. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शिवनगर विद्या प्रसासर मडंळाच्या प्राध्यापक डॉ. नीता दोशी, माळेगाव नगरपंचायतीचे शहर समन्वयक विवेक हाके यांनी महत्वपूर्ण योगदान दिले. दुसरीकडे, माळेगाव नगरपंचायतीला कापडी पिशवी मशीन उपलब्ध करून देणे, वेस्ट टू आर्ट कलाकृतीचे साहित्य, रोपे, सुशोभिकरणासाठी अर्थिक मदत करण्यासाठी अमर तावरे, अजिंक्य तावरे, आदित्य तावरे, प्रशांत तावरे, प्रा. शिर्के, प्रा. सावंत आदींनी पुढाकार घेतल्याने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

छायाचित्र : माळेगाव (ता.बारामती) : नगरपंचायत प्रशासनाच्या वतीने मिशन क्लीन सिटीमधील यशस्वी स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला.
PETA Letter to ECI : रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत खेकडा आणल्यानं 'पेटा'ला आला राग; थेट पत्र लिहून दिला इशारा

यावेळी माळेगाव नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बालाजी लोंढे, शिवनगर संस्थेचे विश्वस्त अनिल जगताप, रविंद्र थोरात, सचिव डॉ. धनंजय ठोंबरे, नगरपंचायतीचे प्रशाकीय अधिकारी आदित्य भुतकर, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य़, डॉ. शैलेंद्र मुकणे, कॉमर्स कॉलेजचे प्राचार्य़ दादासाहेब चांगदुडे, एमबीए कॉलेजचे डॉ. ज्ञानेश्वर पिसाळ, फार्मसी कॉलेजचे डॉ. रामचंद्र जाधव, प्रगतशिल शेतकरी अमर तावरे, पुणे जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य प्रमोद जाधव आदी उपस्थित होते.

मिशन क्लीन सिटीमधील यशस्वी स्पर्धक

शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे डिप्लोमा कॉलेजच्या सिव्हिल डिपार्टमेंटच्या टीमने माळेगावच्या वैकुंठधाम येथे स्वच्छता संदेशपर पेंटिंग केले, परिसर स्वच्छता व वृक्षारोपण असे उपक्रम राबविले. प्राचार्य राजेंद्र वाबळे, प्रा. शुभांगी लाड यांचे मार्गदर्शन संबंधित डिप्लोमा टीमला महत्वपूर्ण ठरले.

प्राचार्य मुकणे, प्रा. दोशी यांच्या मार्गदर्शनाखाली इंजिनिअरिंग कॉलेजच्या टीमने पोलीस स्टेशन परिसर सुशोभीकरण केला. तसेच नागेश्वर मंदिरासह माळेगाव परिसरात वृक्षारोपण, जनजागृती अभियानात एमबीए कॉलेज, कॉलेज ऑफ कॉमर्स व सायन्स विविध टिमचे योगदान महत्वपूर्ण ठरले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.