Prakash Javadekar : मॉल, ऑनलाइन शॉपिंगचे छोट्या व्यापाऱ्यांपुढे आव्हान; माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर

व्यापार भूषण पुरस्काराचे वितरण
Prakash Javadekar
Prakash Javadekaresakal
Updated on

पुणे : देशाची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे ग्राहकांची संख्याही वाढत आहे. बदलत्या काळानुसार लोकांच्या महत्त्वाकांक्षा आणि जगण्याच्या पद्धती बदलत असून, त्यांची खरेदी करण्याची क्षमताही वाढत आहे. परंतु सध्याच्या काळात देशात मॉल आणि ऑनलाइन शॉपिंगचे प्रमाण वाढत आहे. हे वाढते प्रमाण लहान व्यापाऱ्यांसाठी मोठे आव्हान आहे. मात्र या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी छोट्या व्यापाऱ्यांनीही आपल्या व्यवसाय करण्यामध्ये बदल केला पाहिजे, असे मत माजी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सोमवारी (ता.१७) येथे बोलताना व्यक्त केले.

Prakash Javadekar
Nandurbar Crime News : महिलांचा वेश धारण करून सराफाला लुबाडणारे अटकेत; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

शहरातील स्टेशनरी, कटलरी अँड जनरल मर्चंट्स असोसिएशनच्या वतीने व्यापारी एकता दिनानिमित्त आज विविध पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हे पुरस्कार जावडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी या असोसिएशनचे अध्यक्ष सचिन जोशी, माजी अध्यक्ष अंकुश काकडे, किशोर पिरगळ, मोहन कुडचे, सूर्यकांत पाठक, मदनसिंह राजपूत, सुरेश नेऊरगावकर, नितीन पंडित, किशोर चांडक, मोहन साखरिया आदी उपस्थित होते.

Prakash Javadekar
Nashik Crime News: आडगाव शिवारातून कत्तलीसाठी डांबलेल्या गोवंशांची सुटका; आडगाव पोलिसांकडून एकाला अटक

यावेळी या असोसिएशनतर्फे देण्यात येणारा व्यापार भूषण पुरस्कार यंदा कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल यांना प्रदान करण्यात आला. तसेच उत्कृष्ट दुकान पुरस्कार खडकी येथील डी.आर.गांधी आणि कंपनीचे तुषार गांधी व सचिन गांधी, उत्कृष्ट विक्रेता पुरस्कार बुधवार पेठेतील कल्पेश ट्रेडर्सचे राजेश शहा व कल्पेश शहा, फिनिक्स पुरस्कार हा तुळशीबागेतील निकीता दुकानाचे दुर्गेश नवले आणि उत्कृष्ट महिला व्यापारी पुरस्कार स्ट्रीट स्टाईलच्या केतकी सामक यांना प्रदान करण्यात आला. कै. डॉ. धनंजय व साधनाताई गोरे स्मृती पुरस्कार सिंहगड रस्त्यावरील रहिवासी गीता ओक यांना देण्यात आला.

बदलत्या काळानुसार छोट्या व्यापाऱ्यांसमोरील प्रश्नांचे स्वरूप बदलत आहे. केंद्र आणि राज्य सरकारने व्यापारी धोरण करताना छोट्या व्यापाऱ्यांना पूरक ठरतील, अशा भूमिका घेणे गरजेचे आहे. छोटा व्यापारी टिकला तर देशातील सर्वसामान्य माणूस टिकू शकेल. माझ्या आयुष्याची सुरवात ही स्टेशनरी व्यवसायातून झाली होती. त्यामुळे या पुरस्काराचे मला विशेष कौतुक आहे. व्यापार म्हणजे केवळ पैसा कमावणे नव्हे तर व्यापाऱ्यांची सामाजिक बांधिलकी असणे ही गरजेचे आहे. व्यापाऱ्यांनी कोणतीही संधी व प्रामाणिकपणाची कास सोडू नये. तरच तुमचा व्यापार हा एक ब्रँड होऊ शकेल, असे मत सत्काराला उत्तर देताना कृष्णकुमार गोयल यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी अंकुश काकडे, सूर्यकांत पाठक यांनीही मनोगत व्यक्त केले. दिलीप कुंभोजकर यांनी सूत्रसंचालन केले. नितीन पंडित यांनी आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.