Mumbai News: धक्कादायक घटना! मुंबईत पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेलेल्या तरुणाचा मृत्यू, पोलिसांवर गंभीर आरोप

28-year-old Deepak Jadhav’s Suspicious Death at Jogeshwari Police Station Raises Questions : जोगेश्वरी पोलीस स्टेशनने या आरोपांचे खंडन केले असून, तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी हा एक अपघात असल्याचे म्हटले आहे आणि तपासानंतरच खरे कारण स्पष्ट होईल, असे आश्वासन दिले आहे.
 Jogeshwari Police Station
Jogeshwari Police Station esakal
Updated on

मुंबईच्या जोगेश्वरी पोलीस स्टेशनमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीपक जाधव (वय 28 वर्ष) या तरुणाचा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यायला गेले असताना मृत्यू झाला आहे. दीपकचा मृत्यू कसा झाला यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, त्याच्या बहिणीने पोलिसांवर गंभीर आरोप केला आहे की पोलिसांनी मारहाण केल्यामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे.

घटनेचा तपशील

दीपक जाधव हा केटरिंग व्यवसायात काम करत होता, आणि त्याने काही मुला-मुलींना कामावर ठेवले होते. मात्र, वेळेवर पगार न मिळाल्याने दीपक आणि त्याच्या कामगारांमध्ये वाद झाला होता. याच प्रकरणावरून दीपक जोगेश्वरी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यासाठी गेला होता. परंतु त्याच रात्री, पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाल्याचा त्याच्या बहिणीचा दावा आहे.

पंचनामा आणि शवविच्छेदन

घटनेनंतर पोलिसांनी रात्री उशिरा नायब तहसीलदारांच्या उपस्थितीत दीपकच्या मृतदेहाचा पंचनामा केला. मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कुपर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. दीपकच्या कुटुंबीयांचा असा आरोप आहे की पोलिसांनी तपास आणि पंचनाम्यात योग्य पारदर्शकता दाखवली नाही.

 Jogeshwari Police Station
Maharashtra Vidhansabha Election: विधानसभेला भाजपसाठी 'RSS'कडून प्लॅन! संघाच्या 6 गोष्टी महायुती सरकारला वाचवणार का?

कुटुंबीयांचा संताप-

दीपकच्या बहिणीने स्पष्टपणे सांगितले आहे की पोलिसांच्या मारहाणीमुळेच तिच्या भावाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने कुटुंबात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. कुटुंबीयांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. तसेच, दोषी पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

दरम्यान, जोगेश्वरी पोलीस स्टेशनने या आरोपांचे खंडन केले असून, तपास सुरू असल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी हा एक अपघात असल्याचे म्हटले आहे आणि तपासानंतरच खरे कारण स्पष्ट होईल, असे आश्वासन दिले आहे. तर दीपकच्या कुटुंबीयांनी पोलीस विभागाच्या या खुलाशावर नाराजी व्यक्त केली आहे.

 Jogeshwari Police Station
Pune Worli Hit And Run Case: 'हिट अँड रन' प्रकरणाने पुणे पुन्हा हादरलं! बीट मार्शलला इनोव्हा कारने उडवले, पोलिसाचा जागीच मृत्यू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.