Pune News: पुणे दररोज नवनवीन घटनांमुळे गाजत आहे. त्यातच बिबवेवाडीमध्ये आणखी एक खळबळजनक घटना घडली आहे. प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाने अंगावर उलटी केल्याने प्रियकराने मुलाला बेदम मारहाण केली आहे. या मारहाणीत मुलाचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.
प्रियकराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. महेश कुंभार असे आरोपीचे नाव आहे, तर वेदांश काळे असे मृत्युमुखी पडलेल्या मुलाचे नाव आहे. चार वर्षाचा वेदांश खाटेवरून खाली पडल्याने बेशुद्ध पडल्याचा बनाव त्याच्या आईने केला होता. त्यानंतर मुलाला आई पल्लवीने मंगळवार पेठेतील कमला नेहरु रुग्णालयात दाखल केले होते.