Ranveer Photo: पुण्यात मनसेकडून रणवीर सिंगविरोधात तक्रार,आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावरून काढून टाकण्याची मागणी

हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याप्रकरणी व नव्या पिढील भरकटण्यास भाग पाडण्याप्रकरणी रणवीरविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
manase filed Complaint against ranveer singh
manase filed Complaint against ranveer singh esakal
Updated on

आजच रणवीर सिंग या अभिनेत्यावर न्युड फोटोशुटप्रकरणी चेंबुर पोलीसांत गुन्हा दाखल करण्यात आलाय. न्युड फोटोशुट करत महिलांच्या भावना रणवीर दुखावतोय असा आरोप एका एनजीओकडून करण्यात आला होता. त्याच्याविरोधात त्यानंतर गुन्हा दाखल झाला होता. आता पुणे शहरातही त्याच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. तसेच त्याच्यावर हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याप्रकरणी व नव्या पिढील भरकटण्यास भाग पाडण्याप्रकरणी मनसेकडून रणवीरविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.

हिंदू संस्कृतीचा अपमान केल्याचा आरोप

मनसे शारीरिक सेना, पुणे शहराचे अध्यक्ष निलेश काळे यांनी कलम ३५४,५०९,६७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. सोशल मीडिया वर न्यूड फोटो प्रसिद्ध करून 'हिंदू संस्कृतीचा अपमान करत व स्त्रियांना फोटो पाहताना लाज वाटेल असे फोटो रणवीरने पोस्ट केले आहे.तरुण वर्गाला बिघडण्याची व वयात येणारी लहान मुले यांच्यावर वाईट संस्कार होण्याची भीती दर्शवली आहे.' असा आरोप मनसे कडून करण्यात आला आहे.

आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावरून लवकरात लवकर काढावे अशी मागणी मनसेने यावेळी केली. प्रसिद्ध अभिनेत्याचे अनुकरण इतरही लोक करू शकतील असा अंदाज वर्तवत या अभिनेत्या ला चाप बसला पाहिजे अशी मागणी यावेळी मनसेकडून करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.