Manchar News : विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न; मैत्रिणींनी आरडाओरड केल्याने प्रयत्न फसला

विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न दोन मोटारसायकहून आलेल्या चौघांपैकी एकाने केला.
Avsari Khurd
Avsari Khurdsakal
Updated on

मंचर - अवसरी खुर्द (ता.आंबेगाव) रयत शिक्षण संस्थेच्या भैरवनाथ विद्यालयाकडे पायी जात असताना प्रणाली अजय तांबडे (इयत्ता आठवी) या विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून बेशुद्ध करण्याचा प्रयत्न दोन मोटारसायकहून आलेल्या चौघांपैकी एकाने केला. पण तीच्या समवेत असलेल्या मैत्रिणीने आरडाओरडा केल्याने चारही तरुणांनी मोटारसायकलहून पळ काढला.

सदर घटना बुधवारी (ता. ११) सकाळी साडेनऊच्या दरम्यान गायमुख भोरमळा मार्गे अवसरी खुर्द रस्त्यावर उजव्या कालव्याच्या पूर्वेला विहिरीजवळ घडली आहे. आठवड्यात असेच प्रकार दोन वेळा घडले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

या घटनची माहिती समजल्यानंतर अवसरी खुर्द ग्रामपंचायतीचे माजी सदस्य विकास भोर, ग्रामस्थ व पोलीस हवालदार नंदकुमार आढारी यांनी भैरवनाथ विद्यालयाला भेट दिली. प्राचार्य डी. डी. जाधव व संबंधित प्रसंग ओढवलेल्या विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांशी चर्चा करून त्यांना धीर दिला. गुरुवारी (ता. ५) आयुष दीपक तांबडे (इयत्ता पाचवी) व शनिवारी (ता. ७) वेदांत सचिन भोर (पाचवी) या दोन्ही विद्यार्थ्यांच्या बाबतीत भोरमळा रस्त्यावर असाच प्रकार घडला होता.

याबाबत प्राचार्य जाधव म्हणाले, 'घडलेल्या घटनेमुळे विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस यंत्रणेने संबंधितांचा छडा लावण्याचे काम करावे.'

'मिळालेल्या माहितीनुसार १८ ते २० वयोगटातील चार तरुण आहेत. ते दोन मोटारसायकलहून येतात. त्यांच्या तोंडाला रुमाल बांधलेला असतो.एकांत जागेत थांबून विद्यार्थी व विद्यार्थिनीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारून त्यांना बेशुद्ध करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांला खाज येत आहे. पण संबधित तरुणांचा उद्देश अद्याप स्पष्ट झालेला नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी या रस्त्यावर सध्या वेशात पोलीस गस्त घालतील.'

- नंदकुमार आढारी, पोलीस हवालदार मंचर पोलीस ठाणे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()