Dog Attack : मंचरला पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ : १७ जणांवर हल्ला; पाच गंभीर जखमी

दहा लहान मुले, पाच पुरुष व दोन महिलेवर अशा एकूण १७ जणांवर जीवघेणा हल्ला
Manchar mauled dog attacked 17 people Five seriously injured pune
Manchar mauled dog attacked 17 people Five seriously injured punesakal
Updated on

मंचर : मंचर (ता.आंबेगाव) शहरात भैरवनाथ यात्रे निमित्त शुक्रवारी (ता.१४) उत्साहाचे वातवरण असतानाच पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकुळ घातला आहे. दहा लहान मुले, पाच पुरुष व दोन महिलेवर अशा एकूण १७ जणांवर जीवघेणा हल्ला केला.

पाच जणांचे अक्षरशः लचके तोडले आहेत. गंभीर जखमी झालेली चार मुले व एका महिलेला पुढील उपचारासाठी औंध रुग्णालय पुणे येथे पाठविण्यात आले आहे. अन्य जखमीवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पिसाळलेल्या कुत्र्याला संध्याकाळी ठार करण्यात मंचर नगरपंचायतीच्या पथकाला यश आले आहे.

“अंशुमन किरण गुंजाळ (वय 10) दोन्ही गालांवर मोठ्या स्वरूपाच्या जखमा, फजल अब्बास मीर (वय पाच) मानेला मोठी जखम, फुलकलीबाई मंगलसिंग ढोले (वय 35) उजव्या डोळ्याच्या खाली चावा घेतला, अदनान शेख (वय तीन), राजवीर संतोष देठे (वय पाच) या पाच जणांना उपजिल्हा रुग्णालय मंचर येथे प्राथमिक उपचार केल्यानंत पुढील उपचारासाठी औंध रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.” अशी माहिती मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी प्रिया चव्हाण यांनी दिली.

मंचर शहराच्या उत्तर दिशेला मारुती मंदिर, भैरवनाथ मंदिर, बाजार पेठ ते काजीवाडा परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचे आगमन झाले. सुरुवातील फारसे कोणी लक्ष दिले नाही. पण कुत्र्याकडून लहान मुलावरील हल्ल्याचे सत्र सुरु झाल्यानंतर सदर कुत्रे पिसाळलेले आहे. असे लक्षात आल्या नंतर काही तरुणांनी सदर कुत्र्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. पण संध्याकाळ पर्यत कुत्रे मिळाले नव्हते.

विठ्ठल मोतीराम गुंजाळ (वय ६५) हे बाजारपेठेतून रस्त्याने जात असताना पिसाळलेल्या कुत्र्याने त्यांच्या पोटाला चावा घेतला. सौरभ प्रमोद कडदेकर (वय २५) हे दुकानापुढे उभे असताना अचानक कुत्र्याने त्याच्या हाताला चावा घेतला.

“आरुष अक्षय मनकर, मिजल हक ( दोघे वय तीन), शहाअली इमाजअली मीर (वय चार), कृष्णा समाधान गांगुर्डे (वय नऊ), रिजवान मुश्ताक शेख, मंजर सईद शेख (दोघे वय ११), सुनील नथू धीमते (वय ४२, रा चांडोली), संजय पांडुरंग पडघणे (वय ४४, रा. पिंपळगाव), विलास भगवान बोऱ्हाडे (वय ५७), अनुसया अंकुश बढे (वय ६५) यांच्यावर मंचर उपजिल्हा रुग्णालयात डॉ. संजयकुमार भवारी, डॉ. मनोज गोंदाने, डॉ. अश्विनी घोडे, डॉ.बबुल पांडे यांनी जखमीवर उपचार केले.” अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक शिवाजीराव जाधव यांनी दिली.

देवेंद्रशेठ शहा फाउंडेशन यांच्या रुग्णवाहिकेतून जखमींना पुणे येथे फाउंडेशनचे अध्यक्ष निळकंठ काळे यांनी तातडीने नेण्याची व्यवस्था केली. सर्व जखमींना मंचर उपजिल्हा रुग्णालयात आणण्याची व्यवस्था रुग्णवाहिका चालक गौरव बारणे, गणेश शिंदे यांनी केली.

“आठ ते दहा दिवसा पूर्वी ही पिसाळलेल्या कुत्र्याने काही जणांवर हल्ला केला होता. पुन्हा घडलेली घटना गंभीर आहे. मंचर नगरपंचायतीने बघ्याची भूमिका घेवू नये गांभीर्याने उपाय योजना कराव्यात. मंचर उपजिल्हा रुग्णालयात नियमितपणे सर्जनचे पद कार्यरत करावे. त्यामुळे जखमी लहान मुलांवर उपचार करणे सोयीचे होईल.”अशी मागणी आंबेगाव तालुका काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राजू इनामदार व जिल्हा सरचिटणीस .अल्लु इनामदार यांनी केली आहे.

“मंचर शहरात मोकाट कुत्र्यांने धुमाकूळ घातला आहे. तसेच अन्यही मोकाट कुत्र्यांची संख्या मोठी आहे. लवकरच पावसाळा सुरु होणार असल्याने पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मंचर नगरपंचायतीने सदर कुत्र्यांचा ताबोडतोब बंदोबस्त करावा.” गार्गी विशाल काळे पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानशक्ती विकास वाहिनी संस्था मंचर.

“शुक्रवारी संध्याकाळी पिसाळलेल्या कुत्र्याला ठार करण्यात मंचर नगरपंचायतीला यश आले आहे. नगर पंचायतीचे कर्मचारी इनायत मिर्जा, संदीप लोंढे, दिलीप थोरात व बजरंग दलाचे दहा कार्यकर्त्यांचे पथक हातात काठ्या घेवून कुत्र्याच्या मागावर होते. भारतीय स्टेट बँकेच्या बोळात कुत्र्याला गाठविले यावेळी ही कुत्र्याने हल्ला करण्याचा प्रत्यत्न केला होता पण प्रसंगावधान राखून पथकाने कुत्र्याला ठार केले आहे.”

गोविंद जाधव: मुख्याधिकारी मंचर नगरपंचायत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.