मंचर - मंचर (ता. आंबेगाव) नगरपंचायत पथविक्रेत्यांच्या आठ सदस्य जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार पथविक्रेता नामनिर्देशन पत्राचे वाटप व नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याची अंतिम मुदत सोमवार ता. २ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. पण अनेक पथ विक्रेत्यांची मतदार यादीत नावे नाहीत. त्यामुळे निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात यावा. अशी मागणी मंचर पाणीपुरवठा समितीचे अध्यक्ष वसंतराव बाणखेले व ॲड. अमर कराळे यांनी केली आहे.