ज्येष्ठ कवयित्री (स्व) शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी निमित्त मंचरला स्मारक व्हावे: मिलिंद जोशी

महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी अशी अपेक्षा
Manchar on occasion of birth centenary of veteran poet Shanta Shelke Memorial statue Milind Joshi
Manchar on occasion of birth centenary of veteran poet Shanta Shelke Memorial statue Milind Joshisakal
Updated on

मंचर : "मंचर शहरात बालपण गेलेल्या जेष्ठ कवयत्री (स्व) शांताबाई शेळके यांनी साहित्य क्षेत्रात केलेली कामगिरी नेत्रदीपक आहे. त्यांच्या जन्मशताब्दी निमित्त मंचर येथे स्मारक व्हावे. अशी अपेक्षा महाराष्ट्र साहित्य परिषदेचे (पुणे) कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी यांनी व्यक्त केली. मंचर (ता.आंबेगाव) येथे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा मंचरच्या वतीने गुरुवारी (ता.१६) आयोजित केलेल्या ग्रंथ प्रकाशन व ग्रंथ प्रदर्शन सोहळ्यात प्रा.जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवसेने उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील होते. सेवानिवृत्त तहसीलदार सूर्यकांत थोरात यांच्या “पायवाटा” पुस्तकाचे विठ्ठल महामुनी यांनी संपादित केलेल्या “विद्याप्रकाश” व ल.रा.कुंभार यांच्या “काटेरी वाट” या तिन्ही पुस्तकांचा प्रकाशन समारंभ यावेळी झाला.

यावेळी मंचर शाखेचे अध्यक्ष दत्ता पायमोडे, डॉ.ज्ञानेश्वर महाराज थोरात, राजाराम बाणखेले,अँड.अविनाश रहाणे, कामगार नेते अँड.बाळासाहेब बाणखेले, अभियंता बाळासाहेब पोखरकर, बाळासाहेब भडकवाड सुवर्णा विकास कोकाटे, उज्वला सुरेश इंदोरे,सगुना बाणखेले उपस्थित होते. आढळराव पाटील म्हणाले “नगर विकास खात्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मंचर येथे बगीचा उभारणीसाठी एक कोटी रुपये निधी प्राप्त झाला आहे. येथे कवयत्री शांता शेळके यांचे स्मारक उभारले जाईल.” शिवाव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील, प्राचार्य लक्ष्मण वाळुंज व कवी शकील जाफरी यांची मनोगते झाले. सूत्रसंचालन डॉ.प्रा.वैशाली सुपेकर यांनी केले.

“आज मोबाईल संस्कृती, चंगळवादी वृत्तीमुळे घरात लाखोंचे फर्निचर असते. मात्र पुस्तकाला जागा नसते. प्रकाशवाटा हे पुस्तक सत्यशोधक समाजातील जलसा या कवितासंग्रहावर आधारीत असून ते अतिशय दर्जेदार आहे.वाचन संस्कृती टिकवण्यासाठी सामुहिक प्रयत्नांची गरज आहे.”

मिलिंद जोशी कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.