मंचर - श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथे औद्योगिक वसाहतीमध्ये रस्त्याचे केलेले काम निकृष्ट दर्जाचे आहे. सदर कामाबाबत माझे पुणे ब्रेकिंग लाइव्ह न्यूज या चॅनेलवर बातमी प्रसारित करील. सदर कामाची चौकशी झाल्यानंतर तुझ्या कंपनीच्या नावाची बदनामी होईल. हे टाळण्यासाठी मला दहा लाख रुपये दे. त्यानंतर मी दिलेला माहितीचा अधिकार अर्ज मागे घेइल.
अशा पद्धतीने शासकीय ठेकेदाराला ब्लॅकमेल करून दहा लाख रुपयांची खंडणीची मागणी केल्याप्रकरणी मंचर पोलिसांनी माहिती अधिकार कार्यकर्ता योगेश लंघे (रा. सविंदणे, ता. शिरूर) व त्याचा साथीदार दिपक तुकाराम गावडे (रा. हरिद्वार बिल्डिंग दत्तनगर स्टॉप, दिघी पुणे) या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणी शासकीय जगन्नाथ शेपाळ (रा .दिघी पुणे) यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद गुरुवारी (ता.३) दाखल केली आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, सन २०२१ मध्ये गावडे यांनी “श्रीरामपूर येथील औद्योगिक वसाहतीत रस्त्याच्या कामाची निवादा निघाली आहे. सदर काम तुम्ही घेऊन माझ्याकडे द्या असे शेपाळ यांना सांगितले.
शेपाळ यांनी ज्योती इंटरप्राईजेस कंपनीचे कागदपत्र देऊन निविदा भरली. त्या रस्त्याचे काम सहा महिन्यात गावडे यांनी पूर्ण केल्याने त्या मोबदल्यात शेपाळ यांनी त्याला सात लाख ५६ हजार २०० रुपये रोख व काही ऑनलाईन पद्धतीने दिले. प्रकल्प तोट्यात गेल्याने गावडे याने सदरचे पैसे हे मी तुम्हाला पुढील प्रकल्पामध्ये काढून देतो असे सांगितले.
त्यानंतर सन २०२३ मध्ये गावडे हा शेपाळ यांच्याकडे गेला व म्हणाला, 'मी एका बँकेचे कर्ज घेतले आहे. बँकेचे कर्ज थकल्याने माझ्या घरावर जप्ती येणार आहे. मला ४९ लाख रुपयांची मदत करा ते मी तुम्हाला परत करेल.” पण शेपाळ यांनी गावडे यांना आर्थिक मदत देण्यास नकार दिला. त्याचा राग मनात धरून निविदा कामासाठी विश्वासाने शेपाळ यांनी दिलेल्या जनता बँकेच्या कोऱ्या धनादेशावर गावडे याने १५ लाख रुपये रक्कम टाकून तो बँकेत भरला.
शेपाळ यांना बँकेतून फोन आल्याने त्यांनी सदरचा धनादेश बाउन्स करायला सांगितले. धनादेशाचा गैरवापर केल्याने संदर्भात शेपाळ यांनी दिघी पोलीस ठाण्यात गावडे यांच्या विरोधात तक्रार अर्ज दिला. त्यामळे गावडे यांने राग मनात धरून त्याचा नातेवाईक भाऊ योगेश लंघे यांच्याशी संपर्क केला.
श्रीरामपूर औद्योगिक वसाहतीच्या रस्त्याच्या कामाविषयी औद्योगिक वसाहती मुख्यालय पिंपरी चिंचवड येथे ता.२० एप्रिल २०२३ रोजी माहितीच्या अधिकारांमध्ये अर्ज देऊन माहिती लंघे यांनी मागवली. लंघे यांनी अनेकदा शेपाळ यांना भीती दाखवून कुटुंब उद्वस्थ करण्याची धमकी दिली.
ता. ०६ जुलै २०२३ रोजी मंचर येथे महात्मा गांधी हायस्कूल जवळ लंघे याने शेपाळ यांना भेटून धमकी देवून दहा लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर लंघे यांनी गावडे यांच्या सांगण्यावरून शेपाळ यांना वारंवार संपर्क करून भेटुन पैशाची मागणी केली. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बलवंत मांडगे यांच्या मार्गदर्शनाखालीपुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे करत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.