मंचर उपजिल्हा रुग्णालयात एक्स-रे मशीन तंत्रज्ञ नसल्यामुळे बंद

X-Ray-Machine
X-Ray-Machine
Updated on

मंचर - 'मंचर उपजिल्हा रुग्णालयात कोरोना विषाणूच्या प्रदुर्भावाच्या पार्श्वभूमीवर एक्स रे मशीनसाठी तंत्रज्ञ उपलब्ध नसल्यामुळे मशीन बंद आहे. एक्स रे मशीनसाठी लागणारा तंत्रज्ञ उपलब्ध करून द्यावा. शासनाकडून पैसे मिळत नसतील तर गावकरी लोकवर्गणीतून पैसे गोळा करून देवू किंवा मी स्वतः त्याचा पगार देण्यास तयार आहे.” असे पत्र मंचरचे सरपंच दत्ता गांजाळे यांनी वैद्यकीय अधीक्षक चंदाराणी पाटील यांना दिले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

“कोरोना रुग्णांवर उपचार केले जात नाही. एकही पेशंट बरा होवून घरी गेलेला नाही. अतिदक्षता विभागात बऱ्याच रुग्णांना दाखल करून घेतले जात नाही. हि बाब गंभीर आहे. सर्पदंशावरील लस हि उपलब्ध नाही.” असेही आरोप गांजाळे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

“एप्रिल ते १५ जुलै पर्यंत एक हजार ४०० संशयित कोव्हीड रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. ६१ कोव्हीड रुग्णावर सुरुवातीचे उपचार करण्यात आले. सध्या तेरा रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यापैकी चार रुग्णांना शुक्रवारी (ता.१७) घरी सोडले जाईल. एक्स रे मशीनसाठी तंत्रज्ञ मिळावा म्हणून अनेकदा पत्र व्यवहार केला आहे. पण शासनाकडून तंत्रज्ञ उपलब्ध झाला यात आमचा दोष नाही.सर्पदंश प्रतिबंधक लस उपलब्ध आहे. ६९ सर्पदंश रुग्णांवर उपचार केले आहेत.” अशी माहिती उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंदाराणी पाटील यांनी दिली.

मंचर उपजिल्हा रुग्णालयाला एक्स रे मशीनसाठी खासगी व शासकीय तंत्रज्ञ मिळत नाही. हि वस्तुस्थिती माहित असूनही सरपंच गांजाळे राजकारण करत आहेत. त्यांनीच एक्स रे साठी व सोनोग्राफीसाठी खासगी तंत्रज्ञ उपलब्ध करून द्यावा त्याचा पगार आम्ही देवू. असे निवेदन पुणे जिल्हा परिषद सदस्या अरुणा थोरात यांनी दिले आहे.

“भीमाशंकर कारखाना, पराग डेअरी, मोरडे फुड्स यांच्या मदतीतून डायलिसीस विभाग गेल्या चार वर्षापासून सुरु आहे. या विभागासाठी अजूनही शासनाने तंत्रज्ञ दिला नाही. खासगी तंत्रज्ञाचा व काही खासगी सफाई कामगारांचा पगार कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून केला जात आहे. शुद्ध पिण्याचे पाणी, वैद्यकीय साहित्य खरेदीसाठी हि खासगी व्यक्तीकडून पैसे उपलब्ध करून दिले जातात. या पूर्वीहि खासगी डॉक्टराना वेठीस धरण्याचा कोणी प्रयत्न केला. हे सर्वाना माहित आहे. 

रुग्णालयाच्या कामकाजात काडीमात्र योगदान नसणार्यांनी चुकीचे वक्तव्य करू नयेत. मंचर गावाचा वापर करून रुग्णालयाला कोणी बदनाम करू नये. असे हि निवेदनात नमूद केले आहे. निवेदनावर मंचर ग्रामपंचायत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे गटनेते लक्ष्मण थोरात भक्ते, सुहास बाणखेले, जगदीश घिसे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.