Ajit Pawar : मंचर उपजिल्हा ग्रामीण रूग्णालयातील रिक्त पदे भरण्याचे निर्देश

मंचर उपजिल्हा रूग्णालय, तळेघर, पाबळ (ता. आंबेगाव) व मलठण (ता. शिरूर) ग्रामीण रूग्णालयातील रिक्त पदे भरण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले.
Ajit Pawar
Ajit PawarSakal
Updated on

मंचर - मंचर उपजिल्हा रूग्णालय, तळेघर, पाबळ (ता. आंबेगाव) व मलठण (ता. शिरूर) ग्रामीण रूग्णालयातील रिक्त पदे भरण्याचे निर्देश राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी दिले.

मंत्रालय मुंबई येथे गुरुवारी (ता. १४) पवार यांच्या अध्यक्षतेखाली, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील व आरोग्य खात्यातील उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आंबेगाव, शिरूर व खेड तालुक्यातील आरोग्य सेवेबाबत बैठक झाली. यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत विविध कामांना वित्त विभागाची मान्यता व निधी उपलब्ध करण्याबाबत निर्णय घेण्यात आले.

आंबेगाव व शिरूर तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयात अनेक पदे रिक्त आहेत. औषधांचा तुटवडा आहे. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. असे वळसे पाटील यांनी निदर्शनास आणून दिले.

'खेड येथे ट्रॉमा केअर युनिट निर्माण करणे, चाकण रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे व डायलिसीस सेंटर मंजुरी, रांजणी (ता. आंबेगाव), करंदी (ता. शिरूर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र, पिंपरखेड, कारेगांव व पिंपळे खालसा (ता. शिरूर) येथे नवीन आरोग्य उपकेंद्र, निरावागज (ता. बारामती) व जरेवाडी (ता. खेड) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याबाबत पवार यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले.

ते म्हणाले 'उपचारासाठी येणाऱ्या प्रत्येक रुग्णांला उत्तम आरोग्य सेवा मिळाली पाहिजे. गरजेनुसार औषधांचा साठा ठेवावा. याकामी निधी कमी पडू दिला जाणार नाही.'

'आंबेगाव व शिरुर तालुक्यातील आरोग्य सेवा अधिक बळकट होण्यास मदत होईल. उपजिल्हा रुग्णालये व इतर रुग्णालयांमध्ये औषध पुरवठा करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे रुग्णांना आरोग्य सेवा तत्परतेने मिळेल. मंचर उपजिल्हा रुग्णालयात सिटी स्क्यान सुविधाही लवकरच सुरु होईल.'

- दिलीप वळसे पाटील, सहकारमंत्री

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.