Pune Traffic News : मंचर शहरातील पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर; रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी ठरत आहे डोकेदुखी

मंचर शहरातील रस्त्यांवरील चारचाकी व दुचाकी पार्किंगची सुविधा नाही. सतत वाहन कोंडी होते.
manchar traffic jam police parking big issue pay and park govt parking pune
manchar traffic jam police parking big issue pay and park govt parking pune Sakal
Updated on

Manchar News : मंचर शहरातील रस्त्यांवरील चारचाकी व दुचाकी पार्किंगची सुविधा नाही. सतत वाहन कोंडी होते. त्यामुळे नागरिकांना वाहन उभे करणे डोकेदुखी ठरत आहे. शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल बनत असून, आता ‘पे अँड पार्क’ किंवा नगरपंचायतीच्या मालकीचा वाहनतळ उभारण्याची गरज नागरिक बोलून दाखवीत आहेत.

आंबेगाव तालुक्याचे मंचर हे मध्यवर्ती व सर्वात मोठे शहर आहे. लोकसंख्या ५० हजाराच्या पुढे गेली आहे. तालुक्यातील १०४ गावातील तसेच खेड, जुन्नर, शिरूर तालुक्यातील नागरिकांची कामानिमित्त शहरात वर्दळ असते. छत्रपती शिवाजी महाराज चौक,

धर्मवीर चंद्रशेखर बाणखेले (लक्ष्मी रस्ता),छत्रपती संभाजी महाराज चौक, घोडेगाव रस्ता आदी मार्गावर पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यांवर अस्ताव्यस्त गाड्या उभ्या असतात. त्याचा परिणाम वाहन कोंडीवर होत आहे.गर्दीतून वाट काढताना वाहन चालकांची अक्षरशः दमछाक होते.

manchar traffic jam police parking big issue pay and park govt parking pune
Pune Parking : मेट्रोस्थानकाजवळ वाहनतळासाठी जागेचा शोध घेण्यासाठी समिती

गृहनिर्माण सोसायट्यामधेही वाहने लावण्यास योग्य जागा नसल्याने नाइलाजाने लोक रस्त्यावर पार्किंग करतात. अनेक इमारती उभारताना पार्किंग कागदावर दाखवून तेथे दुकाने करून विकण्यात आली. त्यामुळे पार्किंगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. असे नाव न छापण्याच्या अटीवर व्यापाऱ्याने सांगितले.

“शहरात अनेक ठिकाणी पार्किंगचा प्रश्न मोठा आहे. शहरात पार्किंग तळ उभारले; तर त्याचा फायदा होईल व वाहतूक अधिक सुरळीत होण्यास मदत होईल. नगरपंचायत व पोलिस प्रशासनाने एकत्रित यावर उपाय करण्याची गरज आहे. पार्किंगचे तीन तळ कायमस्वरूपी उभारले पाहिजेत.”

- अजय घुले, अध्यक्ष मंचर व्यापारी महासंघ.

manchar traffic jam police parking big issue pay and park govt parking pune
Pune Crime : पार्ट टाइम जॉबच्या आमिषाने संगणक अभियंत्याची फसवणूक

“मंचर शहरातील पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस बिकट होत चालला आहे. नागरिक खरेदीसाठी आल्यानंतर मिळेल तिथे वाहने उभी करतात.माघारी आल्यानंतर दुचाकी चोरीला गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. नगरपंचायतीने ताबडतोब वाहनतळ कार्यान्वित करावे. अन्यथा आंदोलन करावे लागेल.”

- संजय थोरात, जेष्ठ नेते भारतीय जनता पक्ष मंचर

“शहरात काही ठिकाणी वाहनतळ झाले; तर त्याचा फायदा होऊन रस्ते रिकामे राहतील. मंचर बसस्थानकाच्या आवारात दोन एकरपेक्षा अधिक जागा मोकळी आहे. सध्या तेथे वाहने उभी केली जातात.पण सुरक्षा व्यवस्था नाही,

राज्यपरिवहन मंडळांला आर्थिक उत्पन्नही मिळत नाही. सदर वाहनतळ नगरपंचायतीकडे हस्तांतरित केल्यास ना नफा ना तोटा या तत्वावर कामकाज करण्याची तयारी आहे.याबाबतचा पत्रव्यवहार राज्य परिवहन महामंडळाकडे केला जाईल. तसेच अन्य ठिकाणीही वाहनतळ उभे करण्याची कार्यावाही केली जाईल.”

- गोविंद जाधव, मुख्याधिकारी मंचर नगरपंचायत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.