रांजणगावच्या महागणपतीला आंब्यांची आरास

संकष्टी चतुर्थीनिमित्त महागणपतीचा अभिषेक व पूजा करण्यात आली.
रांजणगावच्या महागणपतीला आंब्यांची आरास
Updated on
Summary

संकष्टी चतुर्थीनिमित्त महागणपतीचा अभिषेक व पूजा करण्यात आली.

तळेगाव ढमढेरे (पुणे) : रांजणगाव गणपती (ता. शिरूर) येथील अष्टविनायक मंदिरात शनिवारी (ता. 29) संकष्टी चतुर्थीनिमित्त महागणपतीचा अभिषेक व पूजा करण्यात आली. चतुर्थीनिमित्त महागणपतीला आकर्षक फुलांची सजावट, आंब्यांची आरास व आकर्षक पोषाख आणि सुवर्णालंकार परिधान करण्यात आला होता. (mango and flowers decoration to ranjangaon mahaganapati)

येथील प्रगतिशील शेतकरी नानासाहेब पाचुंदकर पाटील यांच्यातर्फे मुख्य गाभारा व मंदिर परिसरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती, तर निमगाव म्हाळुंगी येथील शेतकरी ज्ञानेश्वर मारुती विधाटे यांच्याकडून चतुर्थीनिमित्त महागणपतीस ३१ डझन आंब्यांचा नैवेद्य देऊन आरास केली होती. श्रीक्षेत्र रांजणगाव देवस्थान ट्रस्टतर्फे महागणपतीला सुवर्णालंकार व आकर्षक पोषाख परिधान केला होता.

रांजणगावच्या महागणपतीला आंब्यांची आरास
Video : मेट्रोसाठी मंडईतील दुकाने हटविली; ७० जणांचे पुनर्वसन

कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर नागरिकांना दर्शनासाठी बंद असले, तरी चतुर्थीनिमित्त महागणपतीचे मनमोहक रूप सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहून नागरिकांनी समाधान व्यक्त केले. देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, अॅड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पुजारी मकरंद कुलकर्णी व प्रसाद कुलकर्णी आदींनी चतुर्थीचे नियोजन केले.

रांजणगावच्या महागणपतीला आंब्यांची आरास
पुणे-नाशिक महामार्गावर झाडाच्या फांद्या कोसळून तीन जण जखमी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.