जुन्नर - जुन्नर वन विभागाच्या कार्यक्षेत्रात जेरबंद करण्यात आलेले दहा बिबटे जामनगर-गुजरात येथील निवारा केंद्रात आज ता. ३१ रोजी सायंकाळी पाठविण्यात आले असल्याचे जुन्नर वनविभागाचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले.
तालुक्यात बिबट्यांच्या हल्ल्याची समस्या अत्यंत गंभीर व ज्वलंत बनल्याने माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रातील दहा बिबटे स्थलांतरित करण्यास दिल्ली येथील केंद्रीय प्रणिसंग्रहालय प्राधिकरणाने परवानगी दिली होती. जगातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय व प्राणी पुनर्वसन केंद्र असलेल्या जामनगरमधील 'वनतारा प्राणीसंग्रहालया'त तालुक्यातील ४ मादी व ६ नर असे एकूण १० बिबटे स्थलांतरित करण्यात आले आहेत.
हे बिबटे तीन महाकाय वातानुकूलित ॲंम्ब्युलन्स मधून नेण्यात येत असून एका वातानुकूलित ॲंम्ब्युलन्स मध्ये ५ बिबटे याप्रमाणे दोन ॲंम्ब्युलन्समध्ये १० बिबटे व एक ॲंम्ब्युलन्स तातडीच्या मदतीसाठी सोबत राहूणार आहे.
जुन्नर तालुक्यातील माणिकडोह येथे तीन ॲंम्ब्युलन्स आज सकाळी पोहचल्या. त्यांचेसोबत गुजरात येथील झु मॅनेजर, पशुवैद्यकीय अधिकारी व २३ मॅनेजमेंट टीमचे सदस्य होते.
माणिकडोह व वनविभाग जुन्नरचे पंधरा अधिकारी व कर्मचारी यांच्या मदतीने दिवसभरात हे बिबटे गुजरातमधून आणलेल्या पिंजऱ्यात दिवसभरात चढवण्यात आले. उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक अमित भिसे, जुन्नरचे वनपरीक्षेत्र अधिकारी प्रदीप चव्हाण व माणिकडोह येथील पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत सर्व बिबटे पिंजऱ्यात सोडण्यात आले.
बिबट्यांना घेऊन जाताना पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसह २० ते २५ जणांचे गुजरातचे पथक ॲंम्ब्युलन्स सोबत आहे. हायड्रॉलिक पद्धतीने दरवाजे उचलण्याची सोय या महाकाय ॲंम्ब्युलन्समध्ये असल्याने सर्व बिबट सुरक्षितपणे ॲंम्ब्युलन्समध्ये चढवले गेले. जुन्नर ते जामनगर हा प्रवास लांबचा असल्याने ॲंम्ब्युलन्समध्ये बिघाड झाल्यास वा अन्य समस्या उद्भवल्यास 'ब्रेकडाउन व्हॅन' ही दिमतीला देण्यात आली आहे.
पाठवणी करण्यात येणाऱ्या बिबट्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना ॲंम्ब्युलन्समध्ये दाखल केले गेले. त्यानंतर ही वाहने जामनगरकडे रवाना करण्यात आली जुन्नर वन विभागाने येथील मानव -बिबट संघर्ष हाताळण्यासाठी उचललेले महत्वपूर्ण पाऊल असल्याचे उपवनसंरक्षक सातपुते यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.