Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील यांचा अटक वॉरंट रद्द, पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला

तब्येत ठिक नसल्याने जरांगे पाटील रूग्णवाहिकेतुन न्यायालयात झाले दाखल
manoj jarange arrest warrant cancelled court issues stern warning hearing on 3rd september
manoj jarange arrest warrant cancelled court issues stern warning hearing on 3rd september Sakal
Updated on

पुणे : नाट्य निर्मात्याची फसवणूक केल्याचा आरोप असल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याच्या सुनावणीसाठी मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील शुक्रवारी न्यायालयात हजर राहिले. तब्येत ठिक नसल्याने जरांगे हे रूग्णवाहिकेतुन न्यायालयात दाखल केले. दरम्याने, न्यायालयाने जरांगे यांचा तीन हजार रूपयांच्या जातमुचलक्‍यावर अटक वॉरंट रद्द केला. याप्रकरणी 3 सप्टेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.

नाटकांचे प्रयोग आयोजित करून त्याचे पैसे न दिल्याप्रकरणी जरांगे यांच्यासह अर्जुन प्रसाद जाधव आणि दत्ता बहीर (सर्व रा. अंबड, जालना) यांच्याविरोधात फसवणूक व अपहार केल्याप्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

याबाबत धनंजय घोरपडे (रा. वारजे) यांनी फिर्याद दिली होती. त्यानंतर न्यायालयाच्या निर्देशानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात न्यायालयाने जरांगे पाटील यांना दोनदा समन्स बजावले होते.

मात्र, आंदोलनामुळे ते न्यायालयात हजर झाले नव्हते. त्यामुळे न्यायालयाने जरांगे पाटील यांच्यासह अन्य दोन आरोपींविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. यापूर्वीही जरांगे यांच्याविरोधात न्यायालयात गैरहजर राहिल्याने अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. त्यानंतर जरांगे मे महिन्याच्या अखेरीस न्यायालयात हजर झाले होते.

न्यायालयाने जरांगे यांना 500 रुपयांचा दंड ठोठावून पुढील सुनावणीला नियमितपणे हजर राहण्याच्या अटींवर वॉरंट रद्द केले होते. परंतु, त्यानंतरही जरांगे हे सुनावणीला गैरहजर राहिल्याने अखेर न्यायालयाने त्यांच्याविरोधात अटकेचे वॉरंट काढले होते.

या पार्श्‍वभूमीवर, जरांगे पाटील हे शुक्रवारी न्यायालयात हजर झाले. जरांगे पाटील यांची तब्येत ठिक नसल्याने ते रूग्णवाहिकेतुन व कडक पोलिस बंदोबस्तात शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास न्यायालयात दाखल झाले.

manoj jarange arrest warrant cancelled court issues stern warning hearing on 3rd september
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचा अटक वॉरंट रद्द! पण कोर्टानं झापलं, नेमकं काय घडलं?

जरांगे पाटील हे संभाजीनगर येथे उपचार घेत असल्याने त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र न्यायालयात सादर करून त्यांच्याविरुद्धचे अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी त्यांच्या वकीलांनी केली. त्यास सरकारी वकीलांनी आक्षेप घेत याप्रकरणी प्रत्येक चौकशीस हजर राहण्याचे न्यायालयाचे आदेश असतानाही जरांगे पाटील हजर राहत नसल्याचा युक्तीवाद सरकारी वकीलांनी केला.

तर अटक वॉरंट रद्द करावे, याबाबत बचाव पक्षाने आपली बाजु मांडली. त्यानुसार, न्यायालयाने अटक वॉरंट रद्द केले. 3 हजार रूपयांच्या जातमुचलक्‍यावर जरांगे पाटील यांचा अटक वॉरंट रद्द करण्यात आला. तसेच या प्रकरणाची पुढील सुनावणी 3 सप्टेंबरला होणार असल्याचा आदेश न्यायायालयाने दिला.

manoj jarange arrest warrant cancelled court issues stern warning hearing on 3rd september
Manoj Jarange Patil: तर ठरलं! मनोज जरांगेंनी विधानसभा निवडणुकीसाठी थोपटले दंड, इच्छुकांची अंतरवाली सराटीत होणार मुलाखत

"मनोज जरांगे पाटील हे 23 जुलै रोजी झालेल्या सुनावणीवेळी हजर नसल्याने न्यायालयाने जरांगे पाटील यांच्याविरुद्ध वॉरंट बजावले होते. आजच्या सुनावणीला जरांगे पाटील हजर राहिले. मागील वेळी ते उपोषणाला बसले असल्याने त्यांची प्रकृती खराब होती, डॉक्‍टरांनी प्रवास करण्यास मज्जाव केल्याने ते न्यायालयात हजर राहिले नाहीत.

त्यांना न्यायालयाबद्दल आदर असल्यामुळेच ते 31 मे रोजी स्वतः न्यायालयात हजर राहिले होते. आज ही ते रूग्णवाहिकेतुन न्यायालयात आले. वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केले. त्यांना मुत्रपिंडाचा त्रास आहे. त्यानुसार, न्यायालयाने तीन हजार रूपयांच्या बॉंडवर त्यांचा अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द केला आहे.' हर्षद निंबाळकर, मनोज जरांगे पाटील यांचे वकील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.