१५ किलोमीटरचे सागरी अंतर २ तास ५१ मिनिटांत पोहून पार
पिंपळवंडी - जुन्नर तालुक्यातील सावरगाव येथील मंत्रा मंगेश कुऱ्हे या अकरा वर्षांच्या मुलीने एलिफंटा ते गेटवे ऑफ इंडिया हे १५ किलोमीटरचे सागरी अंतर २ तास ५१ मिनिटांत पार केले. विशेष म्हणजे मुलींमध्ये सर्वांत कमी वेळेत अंतर पार करण्याचा विक्रम तिने या वेळी केला.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वाशी येथील फादर अग्नेल शाळेत सहावीत शिकणारी मंत्रा ही वयाच्या चौथ्या वर्षापासून फादर अग्नेल स्वीमिंग पूलमध्ये अमित आवळे, गोकूळ कामथ यांच्या मार्गदर्शनाखाली पोहण्याचे धडे घेत आहे. तिने २१ मार्चला सकाळी ६ वाजून १ मिनिटांनी एलिफंटा येथून समुद्रात झेप घेतली व सकाळी ८ वाजून ५२ मिनिटांनी गेटवे ऑफ इंडिया गाठले. हे १५ किलोमीटरचे सागरी अंतर सर्वात कमी वेळेत पोहून तिने आपल्या नावे विक्रम केला. मंत्रा हिच्या या कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी तिचा सत्कार केला. जुन्नरकरांनीही तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
मंत्राने चार वर्षांची असताना पोहण्याला सुरुवात केली होती. मागील वर्षी लॉकडाउनच्या काळात आम्ही सर्वजण सावरगाव येथील घरी राहण्यासाठी आलो होतो. त्या वेळी तेथेही मंत्राने जवळील नदीवर जाऊन पोहण्याचा सराव केला. तिने आतापर्यंत महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक व गुजरात येथील पोहण्याच्या स्पर्धांमध्ये भाग
घेतलेला आहे.
- डॉ. तृप्ती कुऱ्हे, मंत्रा हिची आई
Edited By - Prashant Patil
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.