Maratha Reservation : वडगाव पुलावर टायर जाळून रास्तारोको! पुणे-बंगळुरू हायवेवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा

पुण्यात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहतूक अडवली आहे.
Maratha Reservation : वडगाव पुलावर टायर जाळून रास्तारोको! पुणे-बंगळुरू हायवेवर वाहनांच्या लांबच-लांब रांगा
Updated on

पुणे : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात चांगलाच पेटला आहे. मनोज जरांगे यांचं अंतरवली सराटी येथे उपोषण सुरू असून त्याला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर आंदोलने केली जात आहेत. आज पुण्यातील नवले पुल परिसरात मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी पुणे-बेंगळुरू महामार्गावर वाहतूक अडवल्याचा प्रकार समोर आला. वडगाव तसेच नवले पुलावर वाहनांचे टायर जाळत वाहतूक अडवण्यात आली.

मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांनी नवले ब्रीज येथे घोषणाबाजी करत आंदोलन सुरू आहे. आंदोलनस्थळी वाहनांच्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. तसेच या ठिकाणी मराठा समाजाच्या तरूणांनी मोठ्या संख्यने गर्दी केली आहे. दरम्यान आंदोलकांनी प्रचंड रहदारी असणारा हा रस्ता बंद केल्याने रस्त्याच्या दोन्ही बाजूंना गाड्यांच्या लांब रांगच रांग लागल्या आहेत. यामध्ये शेकडो नागरीक अनेक तासांपासून अडकून पडले आहेत. या वाहतूक कोंडीत अनेक रुग्णवाहिका आणि मुलांच्या स्कूलबस देखील अडकल्याची माहिती मिळत आहे.

वडगाव पुलाजवळ मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग आढळून टायर जाळून आंदोलनामध्ये सहभागी झाले असून दोन तासापासून महामार्ग अडवण्यात आलेला आहे. आंदोलनकर्त्यांनी एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं इत्यादी घोषणा देत आंदोलन तीव्र करण्यात आले. आंदोलन करताना पोलिसांनी समजावल्यानंतर रुग्णवाहिका स्कूल व्हॅन यांना आंदोलनकर्त्यांनी रस्ता मोकळा करून दिला.

जवळपास पाच पाच किलोमीटरच्या वाहनांच्या रांगा लागल्या असून मोठी वाहतूक कोंडी महामार्गावर पाहावयास मिळत आहे. यावेळी पुणे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आंदोलनकर्त्यांना आंदोलन महामार्गावरून बाजू घेण्याची विनंती करत आहेत, परंतु आंदोलक आक्रमक होऊन महामार्गावरच ठिय्या मांडला आहे. यामुळे पोलीस देखील हातबल झाल्याचे महामार्गावर दिसून आले आहे. तसेच पुणे पोलीस दोन-तीनचे डीसीपी सोहेल शर्मा हे देखील आंदोलन करताना शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यास विनंती करत आहे. आंदोलनकर्ते देखील त्यांना त्याप्रमाणे विश्वास देत होते. यावेळी जवळपास हजारो कार्यकर्ते या आंदोलनामध्ये सहभागी झाल्याचे तसेच बघ्यांनी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी केले असून वाहतूक नियंत्रण करण्याचा अडथळा येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.